सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 18:51 IST
1 / 10जगातील सर्वात मोठं वाळवंट असलेल्या सहारा वाळवंटामध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक जुने रेकॉर्ड मोडले असून, या पावसामुळे मोरक्कोमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सहारामधील मुसळधार पाऊस हा निसर्गाची किमया म्हणायची की वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या संकटाची चाहुल म्हणायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2 / 10आफ्रिकेतील सहारा वाळवंटामध्ये मागच्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. 3 / 10दक्षिण पूर्व मोरक्कोच्या काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हा पाऊस वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. 4 / 10 मोरक्कोमधील हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोरक्कोची राजधानी रबातपासून ४५० किमी दूर अंतरावर असलेल्या टेगोनाईट गावामध्ये २४ तासांपासून १०० मिमीहून अधिक पाऊस पाऊस पडला आहे. 5 / 10नासाच्या उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून जगोरा आणि टाटादरम्यान असलेलं आणि पन्नास वर्षांपासून कोरड्या पडलेल्या इरिकी तलावामध्ये पुन्हा एकदा पाणी भरल्याचं दिसत आहे. 6 / 10हवामानखात्याच्या तज्ज्ञांनी सांगितले की, मागच्या ५० वर्षांमध्ये पहिल्यांदा सहारा वाळवंटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. सोशल मीडियावर वाळवंटामध्ये पाणी भरल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 7 / 10याआधी १९७४ मध्ये सहारा वाळवंटामध्ये ६ वर्षे पडलेल्या दुष्काळानंतर पाऊस पडला होता. त्यानंतर येथे मोठा पूर आला होता. 8 / 10मोरक्कोमध्ये हवामान विभागाचे अधिकारी हाउसिन यूएबेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या कमी वेळामध्ये एवढा पाऊस ३० ते ५० वर्षांनंतर पाहायला मिळाला आहे. 9 / 10तज्ज्ञांच्या मते ही घटना एका अतिरिक्त उष्ण कटिबंधीय वादळाचा परिणाम आहे. ते दीर्घकाळापासून प्रदेशातील वातावरणीय बदलांना प्रभाविक करू शकतात. 10 / 10सहारा वाळवंटामध्ये जागतिक हवामानवाढीमुळे टोकाच्या वातावरणीय घटना वाढत आहेत. भविष्यामध्ये आणखी वादळाच्या घटना घडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.