शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आजपासून ९ नियम बदलणार; देशातील कोट्यवधी लोकांवर थेट परिणाम होणार

By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 2:04 PM

1 / 10
धनादेशाद्वारे करण्यात येणारं पेमेंट, फास्ट टॅग, यूपीआय पेमेंट सिस्टिम, जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये १ जानेवारीपासून बदल होणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
2 / 10
चेक पेमेंट सिस्टम: पॉझिटिव्ह पे सिस्टिमच्या अंतर्गत ५० हजार रुपयांपेक्षा अधिकचं पेमेंट करण्यासाठी काही माहिती दुसऱ्यांदा कन्फर्म करावी लागेल. मात्र या सुविधेचा लाभ घ्यायचा की नाही, हा निर्णय खातेधारकाचा असेल. चेक जारी करणारी व्यक्ती ही माहिती एसएमएस, मोबाईल ऍप, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून देऊ शकते.
3 / 10
कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहार: आरबीआयनं कॉन्टॅक्टलेस कार्डची मर्यादा २ हजाराहून ५ हजार केली आहे. त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून ५ हजार रुपयांपर्यंतचं पेमेंट करताना पिन नंबर टाकावा लागणार नाही.
4 / 10
कार महागणार: ऑटोमोबाईल कंपन्या २०२१ मध्ये आपल्या अनेक मॉडेल्सची किंमतींमध्ये वाढ करणार आहेत. मारुती, महिंद्रा यांच्यानंतर रेनॉ आणि एमजीसारख्या कंपन्यांनी कारचे दर वाढवण्याच्या घोषणा केल्या आहेत.
5 / 10
लँडलाईनहून मोबाईलवर कॉल करताना नंबर डायल करण्यापूर्वी शून्य वापरावा लागेल. त्याशिवाय फोन लागणार नाही.
6 / 10
म्युच्युअल फंडाच्या असेट अलोकेशनचे नियम बदलणार आहेत. नव्या नियमांनुसार फंड्सचा ७५ टक्के भाग इक्विटीमध्ये गुंतवावा लागेल. सध्या हे प्रमाण ६५ टक्के इतकं आहे.
7 / 10
यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणं महागणार आहे. थर्टी पार्टीकडून सुरू असलेल्या ऍप्सवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं घेतला आहे.
8 / 10
जीएसटी रिटर्नचे नियम बदलणार: देशातल्या छोट्या व्यापाऱ्यांना त्रैमासिक जीएसटी रिटर्न करण्याची सुविधा मिळेल. नव्या नियमांनुसार, ५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना दर महिन्याला जीएसटी भरावा लागणार नाही.
9 / 10
सरल जीवन विमा पॉलिसी लॉन्च होणार: १ जानेवारीपासून कमी प्रीमियमध्ये विमा खरेदी करता येईल. आयआरडीएआयनं सर्व कंपन्यांना सरल जीवन विमा लॉन्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
10 / 10
काही फोनमध्ये व्हॉट्स ऍप बंद होणार: अँड्रॉईंड आणि आयओएसवर चालणाऱ्या काही फोनमध्ये १ जानेवारीपासून व्हॉट्स ऍप सुरू होणार नाही. जुन्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्स ऍपची सेवा बंद होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.