शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#BigBoss11 : हे आहेत बिग बॉसच्या सर्व ११ पर्वांचे विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 2:15 PM

1 / 11
१) मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय हा बिग बॉस १ चा विजेता होता. २००६ च्या या विजेत्याचा आशिकी हा सुपरहीट म्युझिकल सिनेमा तर आपल्याला माहीत आहेच.
2 / 11
२) रोडीज ५ चा विजेता असलेला हा आशुतोष कौशिक बिग बॉस २ चा विजेता ठरला. हा एक अभिनेता आणि मॉडल असून बिग बॉस (२००८) दरम्यान त्याला चांगला फॅन फॉलोईंग होता.
3 / 11
३) टीव्ही आणि चित्रपट अभिनेता विंदु दारा सिंग हे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचे म्हणजेच २००९चे विजेते होते. कुस्तीपटु आणि अभिनेता दारा सिंग यांचा मुलगा अशीही यांची ओळख आहे.
4 / 11
४) मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी ही २०१०च्या बिग बॉसची विजेती ठरली. चौथ्या पर्वाची ही विजेती श्वेता त्यानंतर झलक दिखला जामध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
5 / 11
५) २०११ मध्ये आलेल्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची विजेती होती अभिनेत्री - निवेदक जुही परमार. त्यानंतर तिने लग्न केले आणि एका मुलीसोबत आता ती आपल्या कुटूंबासोबत रमली आहे.
6 / 11
६) २०१२ च्या बिग बॉस ६ ची विजेती उर्वशी ढोलकिया ही टीव्ही अभिनेत्री आहे. कसौटी जिंदगी की या श्वेता तिवारीच्या मालिकेत तिने कोमोलिका म्हणून खलनायकी भूमिका साकारली होती.
7 / 11
७) बिग बॉस ७ अर्थात २०१७च्या पर्वात अभिनेत्री, मॉडल, नर्तिका गौहर खान विजेती ठरली होती. ती बऱ्याच लहान मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करत आलीये. ‘इश्कझादे’ चित्रपटातील ‘हुआ झोकरा जवा रे’मुळे लोकप्रिय झाली.
8 / 11
८) गौतम गुलाटी हा बिग बॉसच्या आठव्या पर्वाचा विजेता ठरला. २०१५ साली आलेल्य़ा या पर्वात गौतमने बरीच लोकप्रियता मिळवली. अनेक म्युझिक अल्बम्स, टीव्ही मालिका, जाहिराती आणि चित्रपटांत त्याने काम केलं आहे.
9 / 11
९) मुळचा चंदीगढचा असलेल्या प्रिन्स नरुलाने २०१६ साली आलेल्या बिग बॉसच्या नवव्या पर्वात बाजी मारली. रो़डीजपासून स्पिल्ट्सव्हिला या एमटीव्हीवरच्या शोचा तो विनर ठरलेला आहे. सध्या तो मॉडलिंग आणि अल्बम्स करतो.
10 / 11
१०) नोएडाचा मनवीर गुर्जर उर्फ मनोज कुमार हा एक डेअरी मालक २०१७च्या बिग बॉसच्या दहाव्या पर्वाचा विजेता ठरला. काही ऑडीशन्स घेऊन सामान्य जनतेला या पर्वात सहभागी करुन घेण्यात आलं होतं आणि त्यात तो विजेता ठरला.
11 / 11
११) नुकत्याच पार पडलेल्या अकराव्या बिग बॉसची विजेती ठरली शिल्पा शिंदे. दरम्यान हिना खानसोबत तिला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत तिने ’अंगुरी भाभी’ची भूमिका केली होती आणि नंतर ती मालिका सोडून दिली होती.
टॅग्स :Big Boss 11बिग बॉस ११Salman Khanसलमान खानShilpa Shindeशिल्पा शिंदे