These are ranks in the Indian Army, know who is Senior in Major, Colonel & Brigadier
या आहेत भारतीय लष्करातील रँक, जाणून घ्या मेजर, कर्नल, ब्रिगेडियर यांच्यात कोण असतो सिनियर By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 1:42 PM1 / 15शौर्य आणि त्यागाचे चालते बोलते प्रतीक असलेल्या आणि रणभूमीपासून नैसर्गिक आपत्तीपर्यंत देशवासीयांच्या मदतीला धावून येेणाऱ्या भारतीय लष्कराविषयी सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो. आज आपण भारतीय लष्करामधील विविध रॅंकविषयी.2 / 15फिल्ड मार्शल - फिल्ड मार्शल हे भारतीय लष्करामधील सर्वोच्च पद आहे. हे पद नियमित नाही तर सन्मान म्हणून दिले जाते. एखाद्या युद्धामधील सर्वोत्तम कामगिरीनंतर असे पद दिले जाते. आतापर्यंत केवळ दोन लष्करी अधिकाऱ्यांंना हे पद दिले गेले आहे. के एम करिअप्पा आणि सॅम मानेकशॉ हे ते अधिकारी होत. 3 / 15जनरल - जनरल ही लष्करातील सर्वोच्च रँक आहे. या पदावरील अधिकाऱ्याला कमांडर इन चिफ असे म्हटले जाते. जनरल रँक असलेल्या अधिकाऱ्याच्या वर्दीवर एक क्रॉस बॅटन, सॅबर. एक स्टार आणि अशोकस्तंभ चिन्हीत असतो. 4 / 15लेफ्टिनंट जनरल - लेफ्टिनंट जनरल हे जनरल पदानंतरची रॅँक आहे. लेफ्टिनंट जनरलच्या वर्दीवर अशोक स्तंभासोबत बॅटन आणि सॅबर क्रॉस लावलेली असते. या पदावरील निवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. 5 / 15मेजर जनरल - मेजर जनरल हे पद लेफ्टिनंट जनरल पदाखालील रँकचे असते. मेजर जनरल हे पद भारतीय नौदलातील रियर अॅडमिरल आणि हवाई दलातील एव्हीएमच्या रँकच्या बरोबरीचे असते. 6 / 15ब्रिगेडियर - ब्रिगेडियर ही मेजर जनरल या पदाच्या खालील रँक आहे. ब्रिगेडियर हा ब्रिगेडचा प्रमुख असतो. या पदवावरील नियुक्ती ही कमीशंड सर्व्हिसच्या आधारावर होते. ब्रिगेडियरच्या वर्दीवर तीन स्टार आणि एक अशोकस्तंभ असतो. 7 / 15कर्नल - कर्नल पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या वर्दीवर दोन स्टार आणि एक अशोकस्तंभ असतो. त्यापुढील प्रमोशन हे सिलेक्शनच्या आधारावर होते.8 / 15लेफ्टिनंट कर्नल - लेफ्टिनंट कर्नल ही रँक मिळवण्यासाठी लष्करात तेरा वर्षे सेवा करणे अनिवार्य असते. या रँकमधील अधिकाऱ्याच्या वर्दीवर अशोक स्तंभ आणि एक स्टार असतो. 9 / 15मेजर - मेजर रँकच्या अधिकाऱ्याच्या वर्दीवर एक अशोकस्तंभ असतो. मेजरपदावरील दोन वर्षांच्या सेवेनंतर बढती दिली. 10 / 15कॅप्टन - मेजरपदाखालील पद हे कॅप्टनचे असते. लष्करात दोन वर्षे कमिशन्ड अधिकारी म्हणून काम केल्यानंतर कॅप्टन रँकवर बढती दिली जाते. कॅप्टनच्या वर्दीवर तीन स्टार असतात. 11 / 15लेफ्टिनंट - लेफ्टिनंट ही भारतीय लष्करामधील सुरुवातीची रँक असते, आयएमए, ओटीएसारख्या अकादमींमधून प्रशिक्षण घेऊन पास झाल्यावर सुरुवातीला लेफ्टिनंट ही पोस्ट दिली जाते. त्यानंतर त्यांचे प्रमोशन होते. लेफ्टिनंटच्या वर्दीवर दोन स्टार असतात. 12 / 15सुभेदार मेजर - लेफ्टिनंटच्या पदाखालीली पद हे जॉइंट कमिशन्ड ऑफिसर म्हणून गणले जाते. जॉइंट कमिशन्ड ऑफिसरमध्ये सुभेदारपद मेजर हे पद सर्वोच्च असते. सुभेदार मेजरच्या वर्दीवर एक अशोक स्तंभ आणि दोन लाल पट्ट्यांमध्ये एक पिवळी पट्टी असते. 13 / 15सुभेदार मेजर - लेफ्टिनंटच्या पदाखालीली पद हे जॉइंट कमिशन्ड ऑफिसर म्हणून गणले जाते. जॉइंट कमिशन्ड ऑफिसरमध्ये सुभेदारपद मेजर हे पद सर्वोच्च असते. सुभेदार मेजरच्या वर्दीवर एक अशोक स्तंभ आणि दोन लाल पट्ट्यांमध्ये एक पिवळी पट्टी असते. 14 / 15नायब सुभेदार - नायब सुभेदार हे पद सुभेदार मेजर या पदाखालील अशते. या अधिकाऱ्याच्या वर्दीवर एक स्टार आणि लाल व पिवळ्या रंगाची एक पट्टी असते. 15 / 15हवालदार - हवालदारच्या वर्दीवर कोणताही स्टार नसतो. त्यांना एक पट्टी मिळते. त्याशिवाय लान्स नायक, नायक ही पदेही लष्करात असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications