These are the richest states in India, what is the number of Maharashtra? Learn
ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत राज्ये, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 12:28 PM1 / 11भारतामध्ये अनेक बाबतीत विविधता आढळून येते. सामाजिक सांस्कृतिक बाबतीतील विविधतेबरोबरच भारतातील राज्यांमध्ये आर्थिक क्षेत्रातही असमानता आहे. त्यामुळे देशातील काही राज्ये खूप श्रीमंत आहेत, तर काही राज्ये गरीब आहेत. आज जाणून घेऊया, देशातील श्रीमंत राज्यांविषयी. 2 / 11देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत केरळ दहाव्या क्रमांकावर आहे. केरळचा एकूण जीडीपी 8.76 लाख कोटी आहे.3 / 11सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये राजस्थानचा नववा क्रमांक लागतो. राजस्थानचा एकूण जीडीपी 9.29 लाख कोटी एवढा आहे. 4 / 11देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत तेलंगणा आठव्या क्रमांकावर आहे. तेलंगणाचा एकूण जीडीपी हा 10.49 लाख कोटी एवढा आहे. 5 / 1110.49 लाख कोटी जीडीपीसह आंध्र प्रदेश सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. 6 / 11पश्चिम बंगाल हे देशातील सहव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. पश्चिम बंगालचा एकूण जीडीपी 13.14 लाख कोटी रुपये एवढा आहे. 7 / 11सर्वात श्रीमंत राज्यांच्या सूचीत गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातचा एकूण जीडीपी 14.96 लाख कोटी रुपये एवढा आहे. 8 / 11उत्तर प्रदेश हे देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. उत्तर प्रदेशचा एकूण जीडीपी 15.80 लाख कोटी रुपये एवढा आहे. 9 / 11देशातील सर्वात श्रीमंत राज्यांच्या यादीत कर्नाटक हे तिसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. कर्नाटकचा एकूण जीडीपी 15.88 लाख कोटी रुपये एवढा आहे. 10 / 11तामिळनाडू हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. तामिळनाडूचा एकूण जीडीपी हा 17.25 लाख कोटी एवढा आहे. 11 / 11देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राचा जीडीपी हा तब्बल 27. 96 लाख कोटी एवढा आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी तब्बल 10.71 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे. तर या यादीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या केरळपेक्षा महाराष्ट्राचा जीडीपी तिप्पट अधिक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications