These are the top 10 Indian stars in Forbes's list, doing so earning sharply
हे आहेत Forbes च्या यादीतील टॉप 10 भारतीय स्टार्स, करतात एवढी कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 3:37 PM1 / 11फोर्ब्स इंडियाने 100 सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची 2018 मधील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यातील हे अव्वल दहा भारतीय सेलिब्रिटी. 2 / 11सलमान खान - फोर्ब्सच्या यादीत सलमान खान 253.25 कोटी वार्षिक कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिला क्रमांक पटकावण्याचे सलमानचे हे सलग तिसरे वर्ष आहे. 3 / 11विराट कोहली - या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसरे स्थान पटकावले आहे. 228.09 कोटी रुपये एवढी त्याची वार्षिक कमाई आहे. 4 / 11अक्षय कुमार - बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार हा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याची वार्षिक कमाई 185.00 कोटी रुपये एवढी आहे. 5 / 11दीपिका पादुकोण - आघाडीची बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण 112.80 कोटी रुपये वार्षिक कमाईसह या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. 6 / 11महेंद्र सिंह धोनी - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. त्याची वार्षिक कमाई 101.77 कोटी रुपये एवढी आहे. 7 / 11आमीर खान - 97.50 कोटी रुपयांच्या वार्षिक कमाईसह अभिनेता आमीर खान या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. 8 / 11अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांची वार्षिक कमाई 96.17 एवढी आहे. 9 / 11रणवीर सिंह - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह 84.67 कोटी वार्षिक कमाईसह फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. 10 / 11सचिन तेंडुलकर - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वार्षिक 80.00 कोटी रुपये कमाईसह या यादीत नवव्या स्थानावर आहे. 11 / 11अजय देवगण - वार्षिक 74.50 कोटी रुपये कमाईसह अभिनेता अजय देवगण या क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications