शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' लोकांना एक रुपयाही टोल टॅक्स भरावा लागत नाही, सरकारने दिलीय सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 12:42 PM

1 / 6
अनेक वेळा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करता, तेव्हा तुम्हाला दिसते की, अनेक वाहने टोल टॅक्स न भरता टोल प्लाझावरून जातात. ही वाहने बघून असे वाटते की, यामधील व्यक्ती व्हीआयपी (VIP) आहेत.
2 / 6
तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कोणत्याही व्हीआयपी किंवा दबंग व्यक्तीसाठी टोल टॅक्स फ्री केलेला नाही. परंतु NHAI ने देशातील काही सर्व्हिस सेक्टर आणि आपत्कालीन सेवा पुरवठादारांसाठी टोल टॅक्स फ्री केले आहे, हे लोक टोल न भरता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करू शकतात. जाणून घ्या कोण-कोण टोल टॅक्स फ्री प्रवास करू शकते.
3 / 6
रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने टोल टॅक्स न भरता राष्ट्रीय महामार्गावर धावू शकतात. सरकारने या दोन्ही आपत्कालीन सेवांना टोल टॅक्समधून सूट दिली आहे. अशा परिस्थितीत टोल भरताना रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने कधी दिसली नाहीत तर आश्चर्य वाटायला नको.
4 / 6
देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, खासदार आणि आमदार यांना टोल टॅक्स फ्री आहे.
5 / 6
जेव्हा पोलिस, लष्कर आणि निमलष्करी दल राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतात, तेव्हा त्यांनाही टोल टॅक्स भरावा लागत नाही, परंतु त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की, जेव्हा ते त्यांच्या अधिकृत गणवेशात असतील, तेव्हाच त्यांच्यासाठी टोल टॅक्स फ्री असेल.
6 / 6
दिव्यांग व्यक्ती ट्रायसायकल घेऊन प्रवास करत असेल आणि त्याच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असेल तर त्यालाही टोल टॅक्स भरावा लागत नाही. तसेच काही राज्य सरकारांनी शेतकऱ्यांसाठी टोल टॅक्स फ्री केला आहे.
टॅग्स :tollplazaटोलनाका