these schemes of government are very special for farmers see list
सरकारच्या 'या' योजना शेतकऱ्यांसाठी आहेत खास, थेट बँक खात्यात जमा होतो निधी By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 5:17 PM1 / 6नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारची मदत मिळते. कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात आणि शेतीशी संबंधित इतर कामातही मदत करतात, त्याबद्दल जाणून घ्या...2 / 6पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यात पाठवले जातात. म्हणजेच प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. 3 / 6जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना कोणतीही चूक करू नका. योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी शेतकरी पीएम किसान योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.4 / 6पीएम किसान मानधन योजनेंतर्गत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना 3,000 रुपये पेन्शन देत आहे. या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत. जेव्हा शेतकरी वयाची 60 वर्षे पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दरमहा 3,000 रुपये पेन्शन पाठवले जाते.5 / 6प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागतो. ज्यावर सरकार अनुदान देते. 6 / 6केंद्र आणि राज्य सरकारे 50:50 च्या प्रमाणात विनाअनुदानित पिकांसाठी प्रीमियम सबसिडी शेअर करतात. तसेच, केंद्र सरकार अनुदानित पिकांसाठी जास्त अनुदानाचा हिस्सा देते. आणखी वाचा Subscribe to Notifications