शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असा होता अंबानींच्या सुनेचा विवाहातील रॉयल लूक, लेहंगा आणि ज्वेलरीची किंमत ऐकून डोळे विस्फारतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 5:25 PM

1 / 6
उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. २० फेब्रुवारी रोजी अनिल आणि टीना अंबानींचा मुलगा अनमोल अंबानी गर्लफ्रेंड कृशा शाह हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. आता दोघांच्या विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 6
दरम्यान, या फोटोंमध्ये अनिल अंबानींची सून कृशा शाह हिने परिधान केलेल्या पोशाखाचीच जास्त चर्चा सुरू आहे. मीडियामधील रिपोर्ट्सनुसार अंबानी कुटुंबाची सून बनलेल्या कृशा हिने लाखो रुपये किमतीचा लेहंगा आणि कोट्यवधीमध्ये किंमत असलेली ज्वेलरी परिधान केली होती.
3 / 6
कृशा शाह यांनी लग्नासाठी अनामिका खन्नाच्या कलेक्शनचा लेहंगा परिधान केला होता. त्यांच्या या लेहंग्यावर चांदीचे रेशम आणि क्रिस्टलच्या फुलांच्या पॅटर्नची खूप हेवी रचना करण्यात आली होती. या लेहंग्याला परफेक्ट लूक देण्यासाठी त्यांनी लाल रंगाचे फुल एम्बेलिश्ड घुंघटसुद्धा स्पेशल अंदाजामध्ये कॅरी करण्यात आला आहे.
4 / 6
मीडिया रिपोर्ट्समध्ये कृशा शाहच्या या सुंदर लेहंग्याची किंमत ५ लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यावर कुणीही अधिकृत मोहोर उमटवलेली नाही आहे.
5 / 6
जर कृशाच्या ज्वेलरीचा विचार केला तर हेसुद्धा एकदम युनिक आणि सामान्य व्यक्तीच्या बजेटच्या अवाक्याबाहेर आहे. तिने विवाहामध्ये ३० कोटी रुपयांची रॉयल ज्वेलरी कॅरी केली होती. रिपोर्ट्सनुसार त्यांनी ज्वेलरीमध्ये हिरे आणि पन्ना जडवलेले आहेत.
6 / 6
ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कृशाने हातामध्ये चुडा कॅरी केला होता. जर तुम्हीही अंबानीच्या सुनेप्रमाणे वेडिंगमध्ये रॉयल लूक इच्छित असाल तर त्यासाठी टिप्स घेऊ शकता. मात्र हा लूक कॉपी करणे सामान्य व्यक्तींसाठी अवाक्याबाहेर आहे. मात्र त्यासाठी टिप्स घेऊ शकता.
टॅग्स :marriageलग्नCelebrityसेलिब्रिटी