CoronaVirus: ट्रेनसाठी झाली होती गर्दी; 'आरोग्य सेतू'नं जवळच्या कोरोना रुग्णाची माहिती दिली अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 2:41 PM
1 / 8 देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात आतापर्यत ९० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. 2 / 8 कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. 3 / 8 सरकारकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र गाझियाबादमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आल्याचं चित्र आज दिसून आलं. 4 / 8 गाझियाबादच्या घंटाघर रामलीला मैदानात श्रमिकांना एकच गर्दी केली होती. रेल्वे रजिस्ट्रेशनसाठी हे श्रमिक एकमेकांच्या बाजूबाजूला दाटीवाटीनं उभे राहिलेले दिसले. घटनास्थळी पोलीस असले तरी त्यांनाही या गर्दीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नाही. 5 / 8 श्रमिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं सांगण्यात येत होतं. पोलीस आणि प्रशासनाच्या टीम यासाठी प्रयत्न करत होत्या. या टीम श्रमिकांना फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांचं थर्मल स्क्रिनिंगसाठी काम करत होत्या. मात्र काही वेळानंतर ही गर्दी मोठ्या प्रमाणत वाढत गेली. यामध्ये धक्कादायक म्हणजे यावेळी एक कोरोनाचा रुग्ण देखील गर्दीमध्ये उपस्थित होता. 6 / 8 एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य सेतु अॅप सुरु केला. यामध्ये त्याला ५०० मीटरच्या परिसरात एक कोरोना रुग्णही उपस्थित असल्याचं समोर आलं. त्यामुळे गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 7 / 8 कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक उपाय योजना करत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने 'आरोग्य सेतु ' हे अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे कोरोना आजाराबद्दल माहिती मिळणार आहे. याच बरोबर आपल्या परिसरात असलेले कोरोना रूग्ण आणि संशयितांची माहितीही हे अॅप वापरणाऱ्यांना मिळणार आहे, असे केंद्र सरकारने सुचित केले आहे. 8 / 8 आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं. आपण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत का, याची माहिती ब्लूटूथच्या माध्यमातून अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला मिळते. कोरोनाबाधित व्यक्ती किती दूर आहे, याची माहिती यावर मिळते. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती फार दूर असेल तर ग्रीन अलर्ट मिळतो. ती व्यक्ती मध्यम अंतरावर असल्यास ऑरेंज आणि अतिशय जवळ असल्यास रेड अलर्ट मिळतो. आणखी वाचा