शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वडिलांचं स्वप्न लेकीनं पूर्ण केलं; पहिलं अपयश पण IAS अधिकारी बनून मिळवलं 'यश'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 8:00 PM

1 / 12
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC) यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दरवर्षी लाखो भारतीय या परीक्षेला बसतात.
2 / 12
आयएएस अधिकारी बनण्यांचे अनेकांचे स्वप्न असते. आज आपण अशाच एका अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले.
3 / 12
IAS अधिकारी मुद्रा गायरोला या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील रहिवासी आहेस. सध्या त्यांचे कुटुंब दिल्लीत राहते.
4 / 12
आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. गायरोला यांनी १२वी बोर्ड परीक्षेत ९७% आणि १०वी मध्ये ९६% गुण मिळवले होते.
5 / 12
भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांनी गायरोला यांना शाळेत पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. मुद्रा गायरोला यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पदवी घेण्यासाठी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
6 / 12
मुंबईत आल्यानंतर इथेही त्यांनी बीडीएसमध्ये सुवर्ण पदक जिंकले. पण आपल्या लेकीने आयएएस अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची नेहमीच इच्छा होती.
7 / 12
त्यामुळे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन एमडीएसमध्ये प्रवेश घेतला.
8 / 12
मुद्रा गायरोलांचे वडील अरुण गायरोला यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. परंतु ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत.
9 / 12
त्यामुळे मुद्रा गायरोला यांनी आयएएस अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
10 / 12
मुद्रा गायरोला यांचे वडील अरुण गायरोला यांनी १९७३ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यावेळी ते मुलाखतीत पास होऊ शकले नाहीत.
11 / 12
खरं तर वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्रा गायरोला यांनी MDS चे शिक्षण मध्येच सोडले आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. त्या २०१८ मध्ये पहिल्यांदा UPSC नागरी सेवा परीक्षेला बसल्या आणि मुलाखतीच्या टप्प्यात पोहोचल्या.
12 / 12
२०१९ मध्ये मुद्रा गायरोलांनी UPSC ची मुलाखत पुन्हा दिली, पण त्यांची निवड झाली नाही. अखेर त्यांनी २०२२ मध्ये पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली, ज्यामध्ये त्या ५३ व्या रँकसह आयएएस अधिकारी बनल्या अन् स्वप्न सत्यात उतरले.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग