शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Today Gold Rate: सोन्याच्या किंमतीत घसरण; चांदीचा भावही झाला कमी, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 1:33 PM

1 / 5
सध्या लग्नसराईचा सीजन सुरू असून अनेक जण मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. सध्या सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन स्वस्तात मिळत आहे.
2 / 5
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७५३० रुपये आहे. २३ कॅरेट गोल्डची किंमत ४७३४० रुपये आहे.
3 / 5
आता २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३५३७ रुपये आहे. १८ कॅरेटचा ३५,६४८ रुपयांवर पोहोचला आहे. १४ कॅरेट गोल्डचा रेट २७,८०५ रुपये आहे. तर चांदी वायदा भाव ६१,२९६ प्रति किलोग्रॅम आहे.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी