Today Gold Rate: सोन्याच्या दरात वाढ; चांदीची किंमतही बाजारात वाढली, काय आहे आजचा दर?, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 1:46 PM
1 / 5 दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,३२० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,३२० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. 2 / 5 गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 3 / 5 आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किमतीत ०.३४ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी चांदीच्या दरात ०.९६ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. 4 / 5 विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5 लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा