Today Gold-Silver Rate: Gold prices fall after budget Find out, today's rate!
Today Gold-Silver Rate: अर्थसंकल्पानंतर सोन्याचा भाव झाला कमी अन् चांदीच्या किंमतीतही घट; जाणून घ्या, आजचा दर! By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 1:51 PM1 / 5केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थसंकल्पाच्या एकाच दिवसानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे.2 / 5सोन्याचे दर आज ०.२५ टक्क्यांनी घसरून ४८,९८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. 3 / 5 तर, आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात ०.०१ टक्क्यांची घसरली झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ६२,००० रुपये इतका आहे.4 / 5 विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5 लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications