शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आज जंतरमंतर... संजय राऊतांची राहुल गांधींसोबत वाढतेय जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 8:22 PM

1 / 10
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना ब्रेकफास्टसाठी एकत्र आणलं. यावेळी केंद्र सरकारविरोधी अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत या बैठकीसाठी गेले होते.
2 / 10
या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात टाकून चालतानाचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोबद्दल संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-काँग्रेस महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहेत.
3 / 10
आता फक्त हातातला हात खांद्यावर आला इतकचं आहे. खांद्यावर हात ठेवला त्यात वाईट काय? आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य करताना पक्ष जवळ येऊन चालत नाही तर मनही जवळ यावं लागतं असं राऊतांनी सांगितले.
4 / 10
त्याचसोबत जर काही सकारात्मक पावलं पडत असतील तर लोकंही त्याचं स्वागत करतील. शिवसेनेला नेहमीच राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राजकारणात मानाचं स्थान आहे.
5 / 10
राहुल गांधी आणि माझी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरेंचे अनेक निरोप त्यांना दिलेले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत.
6 / 10
राज्यातील सरकार आपण चालवायचं यावरही ते ठाम असल्याचं संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले. आज पुन्हा एकदा राहुल गांधींच्या जवळ संजय राऊत दिसून आले.
7 / 10
विशेष म्हणजे संजय राऊत यांनीच ट्विटर अकाऊंटवरुन आजचे फोटो शेअर केले आहेत. आज जंतरमंतर येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो असल्याचेही राऊत यांनी म्हटलं.
8 / 10
विशेष म्हणजे या आंदोलनात संजय राऊत हे दोन्ही फोटोंमध्ये राहुल गांधींच्या अगदी जवळ दिसून येत आहेत. एकीकडे राहुल गांधींच्या शेजारी बसले आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या बाजूला उभारलेले दिसतात.
9 / 10
दरम्यान, राहुल गांधी यांची शिवसेनेच्या कार्यशैलीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. राहुल गांधींना बाळासाहेबांचा स्वभाव आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल जाणून घ्यायचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते.
10 / 10
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेण्यास ते अत्यंत उत्सुक दिसत होते. एवढेच नाही, तर राहुल गांधी महाराष्ट्र दौरा आणि युतीच्या सर्व नेत्यांना भेटण्यासंदर्भातही बोलले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले होते.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना