Todays Gold- Silver Rate: Gold prices continue to fluctuate; It rose by Rs 1,063 during the week
Todays Gold- Silver Rate: सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ -उतार सुरू; आठवडाभरात १०६३ रुपयांनी महागले By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 7:38 PM1 / 5गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 2 / 5इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनूसार या आठवड्यात सराफा बाजारामध्ये सोन्याची किंमत १०६३ रुपयांनी वाढून ५३ हजार २२० रुपयांवर पोहचली. 3 / 5दूसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजी दिसून येत आहे. चालू आठवड्यात चांदीची किंमत ६९ हजारांवर पोहचली आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications