Top 5 list with highest consumption of Alcohol in India
महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश नव्हे; तर 'या' राज्यांमध्ये होतं दारुचं सर्वाधिक सेवन; आश्चर्यकारक माहिती समोर By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 4:39 PM1 / 7देशात दारूच्या विक्रीवरुन विविध राज्यांमध्ये विविध नियम आहेत. काही राज्य अशी आहेत की जिथं सर्वाधिक दारू विक्री होते. तर काही राज्य अशी आहेत की जिथं दारूविक्री आणि सेवनालाही पूर्णपणे बंदी आहे. 2 / 7देशात सर्वाधिक मद्यपानाचं प्रमाण हे पुरूषांमध्ये जास्त आहे. तर मद्यपान करणाऱ्यांपैकी ९५ टक्के लोक हे १८ ते ४९ या वयोगटातील आहेत.3 / 7देशात सर्वाधिक मद्यपान छत्तीसगढ या राज्यात केलं जातं. छत्तीसगढमध्ये ३५.६ टक्के लोक मद्यपान करतात. राष्ट्रीय स्तरावर हा आकडा १४.६ टक्के इतका आहे. या राज्यात जवळपास ६ टक्के लोक हे पूर्णपणे मद्यपानावर निर्भर आहेत. 4 / 7सर्वाधिक मद्यपान करणाऱ्यांमध्ये त्रिपुरा हे दुसऱ्या स्थानावर आहे. या राज्यात ३४.७ टक्के लोक मद्यपान करतात. तर तब्बल १३.७ टक्के लोक पूर्णपणे मद्यपानावर अवलंबून आहेत.5 / 7पंजाबमध्ये एकूण लोकसंख्येच्या जवळपास २८.५ टक्के लोक मद्यपान करतात. यात ६ टक्के लोक नियमित स्वरुपात मद्यपान करतात.6 / 7अरुणाचल प्रदेशात २८ टक्के जनता मद्यपान करते. यात ७.२ टक्के लोक नियमितपणे मद्यपान करतात. अल्कोहोलचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या मद्याचं सेवन करण्यास येथील लोक प्राधान्य देतात.7 / 7गोवा राज्यात मद्याची खूप मोठी विक्री होते. त्यामुळे या राज्यात मद्यपानाचीही आकडेवारी मोठी आहे. या राज्यातील जवळपास २६.४ टक्के लोक मद्यपान करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications