शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कामगार संघटनांचा देशव्यापी संप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 4:11 PM

1 / 11
विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी आज व उद्या (८, ९ जानेवारी) अखिल भारतीय संपाची हाक दिली आहे.
2 / 11
केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे.
3 / 11
याशिवाय या संपात विमा कंपन्या, संरक्षण उत्पादन कारखाने, केंद्र-राज्य सरकारी कार्यालये, वीज मंडळ, आरोग्य विभाग, अंगणवाडी, आशा कर्मचारी, कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, बांधकाम मजूर आदींचा सहभाग असल्याने देशभरातील कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे समजते.
4 / 11
तसेच, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही संपात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
5 / 11
दरम्यान, आजपासून देशभरात ओडिसा, पश्चिम बंगाल, केरळ, दिल्ली यासह अनेक शहरात कामगार संघटनांनी आंदोलन केले.
6 / 11
या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसक वळण आले. तर, जाळपोळीच्या घटना घडल्या.
7 / 11
पश्चिम बंगालमध्ये कामगार संघटनांच्या आंदोलनाला 24 परगाना जिल्ह्यात हिंसक वळण आले. आंदोलकांनी बस फोडल्या आणि जाळपोळ केली.
8 / 11
पश्चिम बंगालमध्ये कामगार संघटनांच्या आंदोलनाला 24 परगाना जिल्ह्यात हिंसक वळण आले. आंदोलकांनी बस फोडल्या आणि जाळपोळ केली.
9 / 11
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपावरुन टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचेही समजते.
10 / 11
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपावरुन टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचेही समजते.
11 / 11
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपावरुन टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचेही समजते.