शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tricks For Cool Home: भयंकर उकाड्याने हैराण झाला आहात? मग या ट्रिक्स वापरा आणि घराला ठेवा थंडा थंडा कूल कूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 3:45 PM

1 / 6
सध्या देशभरात गरमीची लाट पसरली आहे. लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच भयंकर उष्म्यामुळे घरामध्ये राहणेही कठीण जाले आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झाला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करून तुम्ही घराला थंड ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला फारसा खर्चही करावा लागणार नाही.
2 / 6
उन्हाळ्याच्या दिवसात डेझर्ट कूलरचा वापर करा. तो एसीच्या तुलनेत केवळ १० टक्के विजेचा वापर करून तुमच्या खोलीला थंड करतो. डेझर्ट कुलरला घरात लावून तुम्ही कमी खर्चात उन्हाळ्यापासून दिलासा मिळवू शकता.
3 / 6
उन्हाळ्यामध्ये गरमीपासून वाचण्यासाठी तुम्ही घराच्या पडद्यांना पाण्याने ओले करून ठेवा. जुन्या काळात इजिप्तमध्ये या ट्रिक्सचा वापर केला जात असे. पडदे ओले असल्याने सूर्याची गरमी कमी प्रमाणात घरात यायची. त्यामुळे तुमचं घर थंड राहतं.
4 / 6
गरमीला पळवून लावण्यासाठी आणि आपल्या घराला थंड ठेवण्यासाठी Misting Fan चा वापर करणे हाही एक चांगला पर्याय आहे. Misting Fan ठराविक वेळाने पाणी हवेत पसरवतो. त्यामुळे आसपासची गरमी कमी होऊन थंडावा मिळतो. तसेच या पंख्यासाठी लागणाऱ्या विजेचे प्रमाणही फार कमी आहे.
5 / 6
सीलिंग फॅन हे थंड हवा पसरवत नाहीत. मात्र खोलीत हवा खेळती ठेवतात. त्यामुळे थोडा वेळ एसी सुरू करून बंद केल्यानंतर सीलिंग फॅन सुरू करा. त्यामुळे खोलीत थंड हवेचा प्रभाव कायम राहील. तसेच सतत एसी सुरू नसल्याने तुमचे बिलही कमी येईल.
6 / 6
काही लोक अजूनही जुने लाईट बल्ब वापरतात. हे बल्ब खोलीचं तापमान वाढवतात. त्यामुळे तुम्ही आता एनर्जी एफिशिएंट एलईडी बल्ब घरात लावले पाहिजेत. एलईडी बल्ब कमी वीजेचा वापर करून घरामध्ये प्रकाश पसरवतात. तसेच गरमी वाढू देत नाहीत.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलLifestyleलाइफस्टाइल