शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी, कायदा करण्याचा सरकारला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 4:32 PM

1 / 7
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला सहा महिन्यांची बंदी घातली असून संसदेत कायदा करण्याचा आदेश सरकारला दिला आहे.
2 / 7
ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते.
3 / 7
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
4 / 7
सात याचिकाकर्त्या महिलांनी तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही पाठिंबा दर्शविला होता.
5 / 7
सहा महिन्यात संसदेने कायदा न केल्यास बंदी कायम राहिल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
6 / 7
सरन्यायाधीशांसह 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिला. 5 पैकी 3 न्यायाधीश विरोधात तर 2 न्यायाधीश बाजूने होते.
7 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णयाचं स्वागत करत हा निकाल ऐतिहासिक असून मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल असं सांगितलं आहे.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय