अवकाशप्रेमींसाठी पर्वणी! आकाशात दिसणार नयनरम्य आतषबाजी By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 2:39 PM
1 / 10 अंतराळात एक अतिशय विशेष धूमकेतू सूर्याकडे सरकत आहे. 'स्नोबॉल' म्हणजेच बर्फाच्या गोळ्याच्या आकारासारखा असणारा हा धूमकेतू खास आहे. 2 / 10 अवकाशतज्ज्ञांना हा धूमकेतू पाहणं एक पर्वणीच असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जगभर याचीच चर्चा सुरू आहे. 3 / 10 या विशिष्ट धूमकेतूला स्वान धूमकेतू असे म्हटले जाते. या धूमकेतूमध्ये गोठलेल्या गॅससह खडक आणि धूळ देखील आढळतात. 4 / 10 जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्यांच्यातून वेगवेगळे रंग निघतात. सामान्य लोकांना डोळ्यांनी आकाशातील सर्वोत्कृष्ट आतषबाजीचं दर्शन घडू शकते, असा दावा खगोलशास्त्रज्ञ करतात. 5 / 10 स्वान धूमकेतूची 1 करोड मैलांची लांब 'शेपटी'देखील रंगीत दिसू शकते. ऑस्ट्रेलियाच्या खगोलशास्त्रज्ञांनी एप्रिलमध्ये याचा प्रथम शोध लावला होता. 6 / 10 दक्षिण गोलार्धातील अनेकांना हा धूमकेतू पाहता येणार आहे. पण भारत हा उत्तर गोलार्धात येतो, त्यामुळे भारतातील लोक सूर्योदयाच्या अगोदरही तो पाहू शकतात. 7 / 10 forbes.comच्या रिपोर्टनुसार, भारतासह उत्तर गोलार्धात राहणा-या लोकांना सूर्योदय होण्याच्या अवघ्या एक तासापूर्वी सोमवारी हा धूमकेतू पाहता आला आहे. 8 / 10 दुर्बिणीच्या सहाय्याने आकाशातील ईशान्य दिशेकडे हा धूमकेतू पाहता आला आहे. याला कदाचित वर्षाचा सर्वोत्कृष्ट धूमकेतू असेही म्हटले जात आहे. 9 / 10 तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, 18 मे 2020 हा दिवस धूमकेतू पाहण्याचा सर्वोत्तम दिवस असू शकतो. 10 / 10 जर आकाश स्वच्छ नसल्यास पुढचे दोन दिवस आणि सूर्योदय होण्यापूर्वी प्रयत्न केल्यास हा धूमकेतू दिसू शकतो. स्वान धूमकेतू जोपर्यंत सूर्याकडे पोहोचत नाही, तोपर्यंत तो पाहण्याची संधी मिळू शकते. स्वान धूमकेतू ते 26 मेपर्यंत सूर्याजवळ पोहोचू शकतो. आणखी वाचा