शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोएडात अवघ्या ९ सेकंदांत पाडणार ४० मजल्यांचे दोन टॉवर; २५०० किलो स्फोटकं वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 9:54 AM

1 / 5
नोएडामधील सुपरटेकचे ४० मजल्यांचे दोन्ही टॉवर्स २२ मे रोजी केवळ ९ सेकंदांत पाडले जाणार आहेत. बेकायदा असल्याने हे तोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने ३१ ऑगस्ट रोजी दिले. यासाठी २५०० किलो स्फोटके वापरली जाणार आहे.
2 / 5
प्रथम ३१ मजल्याचा ९७ मीटर उंचीचा सियान हा टॉवर पाडला जाईल. त्यानंतर ३२ मजल्यांचा १०० मीटर उंचीचा अपेक्स हा टॉवर पाडला जाईल.
3 / 5
स्फोटावेळी दोन परदेशी तज्ज्ञ, एक पोलीस कर्मचारी, एक विस्फोट घडविणारा आणि एक एडिफाइस कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर असे मिळून केवळ पाच जणांना तिथे थांबण्याची परवानगी असेल.
4 / 5
दोन्ही टॉवर्समध्ये तळ मजला, पहिला, दूसरा, ६वा, १०वा, १४वा, १८वा, २२वा, २६वा आणि ३०वा या मजल्यांवर १० प्रायमरी स्फोट केले जातील.
5 / 5
मलबा दूर पडू नये यासाठी इमारतीच्या कॉलममध्ये वायर्ड मॅश व जिओटेक्स्टाइल फॅब्रिक लावले जाईल. तसेच इमारती पाडण्याआधी काही तास येथील जवळपास १५०० परिवारांना येथून दूर जावे लागेल. इमारत पाडल्यानंतर दोन तासांनी ते येथे परत येऊ शकतात. या भागात येणारी वाहतूक काही तासांसाठी बंद केली जाईल.
टॅग्स :delhiदिल्लीIndiaभारत