two countries two love stories india vs pakistan seema haider became celebrity anju became villain
भारत-पाकिस्तान! 2 देश, 2 लव्हस्टोरी... सीमा हैदर झाली सेलिब्रिटी अन् अंजू बनली खलनायिका By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:02 AM1 / 12आपलं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानातून ग्रेटर नोएडाला पोहोचलेली सीमा हैदर आणि राजस्थानच्या भिवडीतून पाकिस्तानात गेलेली अंजू यांची गोष्ट सध्या जोरदार चर्चेत होती. सीमा हैदर लोकांच्या नजरेत सेलिब्रिटी झाली तर अंजू खलनायिका बनली आहे. 2 / 12सचिन मीणावर असलेल्या प्रेमापोटी आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून पळून आलेली सीमा पहिल्यापासून तिच्या बोलण्यावर ठाम राहिली. देशाच्या सुरक्षा यंत्रणांनीही तिची स्वतंत्रपणे चौकशी केली. पण, तिच्या वक्तव्यात अजिबात फरक पडला नाही.3 / 12दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या प्रियकर नसरुल्लापर्यंत पोहोचलेल्या अंजूबद्दल लोक विविध गोष्टी बोलत आहेत. नसरुल्लासोबत पाकिस्तानात राहायचं ठरवलं असतानाही अंजू सुरुवातीपासून प्रत्येक पावलावर खोटं बोलत राहिली. ती तिच्या लहान, निरागस मुलांची आणि लोकांची दिशाभूल करत राहिली.4 / 12सीमा हैदर आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. सीमा आणि सचिनवर पाकिस्तान ते ग्रेटर नोएडा हा चित्रपट बनत आहे. त्याचे शूटिंगही काही दिवसांत दिल्लीत सुरू होणार आहे. सीमाचा पाकिस्तान ते चित्रपटांपर्यंतचा प्रवास विशेष रंजक आणि थरारक होता.5 / 12ग्रेटर नोएडामध्ये पोहोचल्यानंतर सीमावर अनेक आरोप करण्यात आले. पण, ती तिच्या बोलण्यावर ठाम राहिली. तिने देशातील मीडिया, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना तोंड दिलं. सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. जन्माष्टमी असो की शिवरात्री, हिंदू रितीरिवाजानुसार पूजा करते. सीमा मनापासून हिंदू धर्म स्वीकारत आहे.6 / 12दोन मुले आणि पतीसह भिवडी येथे राहणारी अंजू खोटं बोलून पाकिस्तानात गेली. मैत्रिणीसोबत फिरायला जात असल्याचे तिने पतीला सांगितले. एक-दोन दिवसांत परत येईल. पण, पाकिस्तानात पोहोचल्यानंतरही ती खोटं बोलत राहिली. सुरुवातीला तिने काही दिवसात परत येईल असे सांगितले. 7 / 12अंजूचे नसरुल्लासोबतचे प्री-वेडिंग शूट आणि निकाहाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अंजूचा पती अरविंदने तिच्याशी संबंधित अनेक मोठे खुलासे केले. पाकिस्तानात अंजूला तिथल्या उद्योगपतींनी आणि नेत्यांनी भेटवस्तू दिल्या. ती कधी फिरताना तर कधी सोशल मीडियावर पाकिस्तानी उद्योगपतींचा प्रचार करताना दिसत होती.8 / 12अंजू पाकिस्तानात पोहोचल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तिच्या मुलीने मीडियाशी बोलताना सांगितलं की, आईचा चेहरा पाहायचा नाही. अरविंदने देखील मुलं तिचा तिरस्कार करतात. अनेकवेळा फोन करून मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला असं म्हटलं आहे. 9 / 12पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे मुंबई ते कराची तिकीट बुक करण्यात आले आहे. यानंतर सीमा हैदर खरोखरच पाकिस्तानात जाणार का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. तर मेरठचे सपा नेते अभिषेक सोम यांनी सीमा हैदरवर चित्रपट बनवण्यास विरोध केला आहे. 10 / 12अभिषेक यांनी चित्रपट दिग्दर्शक अमित जानी आणि सीमा हैदर यांचे तिकीट बूक केले आहे. हे तिकीट 3 डिसेंबर 2023 चे आहे. तिकीट फक्त सीमा हैदर आणि अमित जानी यांच्यासाठी बुक करण्यात आलं आहे, सीमाच्या चार मुलांसाठी नाही.11 / 12सीमा हैदर पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे यूपी एटीएस सीमाची चौकशीही सातत्याने करत आहे. याच दरम्यान, सीमा हैदरच्या मुद्द्यावरून काही लोक वेगवेगळ्या हेतूने प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत.12 / 12चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी अलीकडेच सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर कराची ते नोएडा असं नाव असलेला चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली. यासाठी सीमा आणि सचिनच्या भूमिकांसाठी नोएडामध्ये ऑडिशन्सही घेण्यात आल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications