two girl in west bengal marriage to each other same sex marriage which is still not leagal in india
पतीपासून घटस्फोट घेतला, नंतर मैत्रिणीसोबत लग्नगाठ बांधली; हे होते फारकत घेण्याचे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 10:45 AM1 / 8समलैंगिकांच्या हक्काबाबत सध्या देशात चर्चा सुरू आहे. दरम्यान, कोलकातामध्ये समलैंगिक विवाह झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथे एका मंदिरात दोन मुलींचे पारंपरिक पद्धतीने लग्न झाले. 2 / 8मौसमी दत्ता आणि मौमिता मजुमदार यांनी रविवारी मध्यरात्री भूतनाथ मंदिरात लग्न केले नंतर त्यांनी सोशल मीडियावर लग्नाची माहिती दिली.3 / 8या जोडप्याने माध्यमांनी सांगितले की, मौसमी दत्ता आधीच विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. तिचा पती तिला दररोज मारहाण करायचा, त्यामुळे ती पतीपासून वेगळी झाली.4 / 8'मलाही दोन मुले असून त्यांची जबाबदारी माझी आहे, असंही तिने सांगितलं. या दोगीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आल्या. नंतर जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मजुमदार यांनी त्यांच्या मुलांना स्वेच्छेने स्वीकारले.5 / 8सध्या या दोघीही उत्तर कोलकाता येथे भाड्याच्या घरात राहत असून समलिंगी विवाहाबाबत त्यांना माहिती आहे. 6 / 8सुप्रीम कोर्टाकडून अनुकूल निकालाची अपेक्षा करत दत्ता म्हणाले की, निकाल काहीही लागो, मी नेहमीच मुझुमदार यांच्यासोबत असेल.7 / 8समलिंगी विवाहाच्या प्रमाणपत्राला न्यायालय परवानगी देत नसले तरी कोणताही नियम त्यांना एकत्र राहण्यापासून रोखत नाही, असा दावा दोघींनी केला.8 / 8याआधीही कोलकात्यात असे अनेक विवाह झाले आहेत. वर्षानुवर्षे एकत्र आनंदाने राहणारे सुचंद्र आणि श्री दोघेही आता शहरातील LGBTQ हक्क चळवळीचे लोकप्रिय चेहरे आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications