शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दोन तरुणांची प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उडी घेतली, नेमकं काय घडलं, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 2:43 PM

1 / 6
संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे प्रकरण आज समोर आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी सभागृहात उडी मारली. त्यानंतर त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. खासदारांनी त्यांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
2 / 6
दरम्यान, आज १३ डिसेंबर रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षं पूर्ण झाली आहे. त्याच दिवशी लोकसभेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
3 / 6
संसदेत घुसलेल्या दोन तरुणांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोन्ही तरुण लोकसभेच्या व्हिजिटर पासवर कॅम्पसमध्ये आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, दोन्ही लोक म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवरून आले होते.
4 / 6
या घटनेनंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. कारवाईदरम्यान उपस्थित असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, गॅलरीतून आत उडी मारलेल्या तरुणाच्या हातात काहीतरी जड होते ज्यातून गॅस बाहेर पडत होता.
5 / 6
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, अचानक सुमारे २० वर्षांच्या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि त्यांच्या हातात डबा होता. या डब्यांमधून पिवळा धूर निघत होता. त्यापैकी एक जण सभापतींच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न करत होता.
6 / 6
सदर घटनेनंतर संसद भवनाबाहेर एक महिला आणि एक पुरुष घोषणाबाजी देताना दिसले.
टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद