शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar New Rule 2023: एकदम EASY! आता 'आधार'वरील पत्ता अपडेट करा चुटकीसरशी, वाचा नव्या वर्षातली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 5:19 PM

1 / 7
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डवरील पत्ता अपडेट (Address Updates in Aadhaar) करण्यासंदर्भात नवा नियम जारी केला आहे. आजवर आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी व्यक्तिगत अॅड्रेस प्रू्फ (Address Proof) द्यावा लागत होता. पण आता त्याची गरज भासणार नाही.
2 / 7
आता तुमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं आधार कार्ड पुरावा म्हणून सबमिट करुन क्षणार्धात तुमचा पत्ता अपडेट करु शकणार आहात. UIDAI ने यासंदर्भातील माहिती नुकतीच दिली आहे. पण तुमच्या आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी तुमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची त्यास सहमती असणं गरजेचं असणार आहे. कुटुंबप्रमुखाच्या सहमतीनंतरच तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं आधारवरील पत्ता अपडेट करू शकणार आहात.
3 / 7
आधारमध्ये कुटुंब प्रमुखाच्या पत्त्याच्या मदतीनं ऑनलाइन पत्ता अपडेट करण्याची सुविधा कुटुंबप्रमुखाची मुलं, पती किंवा पत्नी, आई-वडील यांच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. ज्या आधार कार्ड धारकांकडे पत्ता अपडेट करण्यासाठी स्वत:च्या नावाचे कोणतेही सपोर्टिंग डॉक्युमेंट नाहीत त्यासाठी ही सुविधा नक्कीच फायदेशीर ठरेल.
4 / 7
आधारवर कुटुंब प्रमुखाच्या पत्त्याच्या मदतीनं आधार अपडेट करण्यासाठी राशन कार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी कागदपत्र सादर करता येतील. पण यात कुटुंब प्रमुखासोबतचं तुमच्या नात्याचा उल्लेख असणं गरजेचं आहे. जर नात्याचा उल्लेख करणारा देखील पुरावा तुमच्याकडे नसेल तर कुटुंब प्रमुखाचे सेल्फ डिक्लरेशन सबमिट करता येईल.
5 / 7
वेगवेगळ्या शहरात नोकरी करणाऱ्यांसाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरेल. तसंच १८ वर्षावरील कोणताही व्यक्ती कुटुंब प्रमुख बनू शकतो आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या कुटुंबीयांसाठी आपला पत्ता शेअर करू शकतो.
6 / 7
ऑनलाइन सुविधेचा वापर करण्यासाठी 'My Aadhaar' पोर्टल (https://myaadhaar.uidai.gov.in) वर जाऊन ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर अर्ज करणाऱ्याला कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर नमूद करावा लागेल. आधार नंबर व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती इथं दिसणार नाही.
7 / 7
कुटुंब प्रमुखाच्या व्हेरिफिकेशननंतर अर्जदाराला कुटुंब प्रमुखासोबतच्या नात्याचा पुरावा असणारे कागदपत्र जसं की राशन कार्ड इत्यादी अपलोड करावं लागेल. यासाठी ५० रुपये शुल्क आकारलं जातं. पेमेंटनंतर तुम्हाला रिक्वेस्ट नंबर प्राप्त होईल. याच्याशी निगडीत एक SMS देखील तुमच्या मोबाइल नंबरवर येईल. कुटुंब प्रमुखानं रिक्वेस्ट नाकारली तर तुम्ही भरलेलं शुल्क परत केलं जाईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड