बेवफा चायवाला... गर्लफ्रेंड सोडून गेलेल्यास १० रू अन् जोडप्याला १५ रुपयांत चहा By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 7:15 PM
1 / 9 बिहारच्या बेतियातील मनुआपुल येथे एक चहावाला सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. बेवफा चायवाला २ असं या चहावाल्याच्या कँटीनंचं नाव आहे. 2 / 9 या चहाच्या ठेल्यावर प्रेमी युगुलांसाठी १५ रुपयांना चहा मिळतो, तर ज्यांना गर्लफ्रेंड सोडून गेलीय, त्या युवकांना १० रुपयांत चहा विकला जातो. 3 / 9 कुमार कार्तिक असं या चहवाल्या युवकाचं नाव असून तो गरीब घरातून आलेला आहे. त्यास, हालाकीच्या परिस्थितीमुळेच केवळ ८ वी पर्यंतच शिक्षण करता आलं. 4 / 9 लहानपणापासूनच गायक व्हायचं त्याचं स्वप्न होतं, पण गाणं रेकॉर्ड करुन ते रिलीज करण्यासाठीचे पैसे नसल्याने ती आवड केवळ आवडच राहिली. 5 / 9 सन २०१६ साली मजुरी करत त्याने काही पैसे कमावले अन् त्यातूनच गाण्याची आवड जोपासत गेला. दरम्यान, याच काळात एका मुलीशी ओळख झाली, तो तिच्या प्रेमात पडला. 6 / 9 ती मुलगीही गायिका होऊ इच्छित होती, त्यामुळे कार्तिकने आपल्या पैशाने तिचे गाणे रेकॉर्ड केले. एक महिन्यापूर्वी त्या गायिकाचं गाणं हिट झालं. 7 / 9 प्रेयसीचं गाणं हिट झाल्यानंतर ती कार्तिकला सोडून गेली. तिने कार्तिकची फसवणूक केली. तर, नंबरही ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. 8 / 9 विशेष म्हणजे कार्तिकने कर्ज काढून गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन दिला होता. तरीही प्रेयसी बेवफा झाली, ती कार्तिकला सोडून निघून गेल्याने कार्तिकला मोठं दु:ख झालं. 9 / 9 प्रेयसीच्या विरहातून सावरल्यानंतर कार्तिकने बेवफा चायवाला २ नावाने चहाचा स्टॉल सुरू केला. त्यावर, बेवफा शायरीही लिहिली. तर, बेवफा लोकांना ५ रुपये कमी किंमतीत चहा ठेवला. त्यामुळे हा चहावाला चांगलाच चर्चेत आला आहे आणखी वाचा