शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर इंधनावरील खर्च निम्म्यावर येईल; गडकरींनी सांगितले दोन स्वस्त अन् मस्त पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:38 PM

1 / 8
इंधनाचे दर आभाळाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि ४ राज्यांमध्ये निवडणूक असल्यानं १०० हून अधिक दिवस इंधन दर स्थिर होते. मात्र निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात झाली. ही दरवाढ आता सर्वसामान्यांचं कंबरडं मोडत आहे.
2 / 8
इंधनाचे दर वाढल्यानं वाहतूक खर्च वाढला आहे. त्याचा थेट परिणाम अन्नधान्यांच्या किमतींवर होत आहे. महागाई वाढली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या खिशाला बसत आहे. इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. मात्र केंद्र सरकार सध्या तरी दिलासा देण्याच्या विचारात नाही.
3 / 8
इंधन दरवाढीनं महागाईचा आगडोंब उसळला असताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी काही पर्याय सांगितले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असताना इंधनाचे पर्यायी स्रोतांच्या प्रयोगांचा शोध घ्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.
4 / 8
मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गांचा वापर वाढावयाला हवा. कारण जल वाहतूक सर्वात स्वस्त आहे, असंही गडकरींनी सांगितलं. ते वॉटरवेज कॉन्क्लेव-२०२२ मध्ये बोलत होते.
5 / 8
पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. ती लक्षात घेता आता स्वस्त आणि पर्यायी इंधनांचा शोध घेणं आवश्यक आहे. मेथनॉल डिझेलचा पर्याय असू शकतो. मेथनॉल डिझेलपेक्षा स्वस्त आहे आणि डिझेल इंजिनाला मेथनॉलवर चालणारं इंजिनात बदलण्याचं तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे, असं गडकरींनी सांगितलं.
6 / 8
आसाममध्ये दररोज १०० टन मेथनॉलचं उत्पादन करतो. हाच आकडा ५०० टनांवर नेण्यात येईल. तंत्रज्ञानाचा वापर करून डिझेल इंजिनाचं रुपांतर मेथनॉलवर इंजिनांमध्ये केल्यास त्याचा फायदा आसामला होईल. मेथनॉलच्या वापरामुळे इंधनाची मागणी ५० टक्क्यांनी कमी होईल, अशी आकडेवारी त्यांनी मांडली.
7 / 8
माल वाहतुकीसाठी जलमार्गांचा वापर वाढवण्यासाठी प्रयोग व्हायला हवेत. रस्ते वाहतुकीसाठी येणारा खर्च १० रुपये असल्यास रेल्वे वाहतुकीसाठी तो ६ रुपये असतो. त्याऐवजी जलमार्गांचा वापर केल्यास खर्च केवळ १ रुपयावर येतो, असं गडकरी म्हणाले. सध्या माल वाहतुकीवर होणारा खर्च खूप आहे आणि तो कमी करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं.
8 / 8
जलमार्गांवर लक्ष केंद्रीत केल्यास व्यापार वाढेल. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असं गडकरींनी सांगितलं. जहाजांमध्ये मेथनॉलचा वापर करावा आणि व्यापारासाठी जलमार्गांचा अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला गडकरींनी केंद्रीय बंदरं आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना दिला.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीFuel Hikeइंधन दरवाढ