शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेट्रोल डिझेलच्या जाचातून सुटका, आता केवळ ८ रुपये प्रतिलीटर; काय आहे नवा प्रयोग?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:53 AM

1 / 10
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्ते आणि द्रुतगती मार्गांच्या निर्मितीमध्ये रात्रंदिवस व्यस्त आहेत. अलीकडच्या काळात रस्त्यांचे जाळे टाकण्यात गडकरींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एवढेच नाही तर रस्त्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी अनेक योजनांवर काम करत आहेत.
2 / 10
नुकतेच गडकरींनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावरून संसद भवनात जाण्यासाठी ग्रीन हायड्रोजन कारचा वापर केला. ग्रीन हायड्रोजनपासून बनवलेल्या कारच्या आगमनाने आगामी काळात देशवासियांची प्रदूषणापासून मोठ्या प्रमाणात सुटका होणार आहे.
3 / 10
नितीन गडकरी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजन तयार होईल, त्याची स्टेशन्स असतील आणि देशाची आयातही वाचेल. त्यामुळे नवीन रोजगारही निर्माण होणार आहे. आपण हायड्रोजन निर्यात करणारा देश बनू. ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा (उदा. सौर, वारा) वापरून पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे तयार केला जातो आणि कमी कार्बन फूटप्रिंट असतो
4 / 10
तपकिरी हायड्रोजन कोळसा वापरून तयार केला जातो. जिथे उत्सर्जन वातावरणात बाहेर टाकले जाते. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, ओएनजीसी आणि एनटीपीसी सारख्या भारतातील मोठ्या कंपन्यांनी या दिशेने काम सुरू केले आहे. आगामी काळात देशात ग्रीन हायड्रोजनसह वाहनांची संख्या वाढणार आहे.
5 / 10
१६ मार्च रोजी ग्रीन हायड्रोजन इंधन सेलवर चालणारी देशातील पहिली कार टोयोटा मिराई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात लॉन्च केली होती. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.
6 / 10
सातत्याने होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र आता सरकारने यावर उपाय शोधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन इंधनासह तुमची कार चालवण्यासाठी प्रति किमी फक्त ४० पैसे मोजावे लागणार आहेत.
7 / 10
सरकार ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणार आहे. एवढेच नाही तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही कार कंपन्यांशी पहिल्या फेरीबाबत चर्चा केली आहे. लवकरच देशात हायड्रोजनवर चालणाऱ्या कार बाजारात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तुम्हाला ८ रुपये प्रति लिटर इंधन मिळण्याची शक्यता आहे.
8 / 10
ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. एवढेच नाही तर इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांबाबत गडकरींनी कंपन्यांशी बोलण्यास सांगितले. जेणेकरून जनतेच्या खिशावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा भार पडू नये. लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार बाजारात येणार असल्याचे संकेत गडकरींनी दिले. कार निर्मात्यांसोबत लवकरच अंतिम चर्चा केली जाईल. जेणेकरून ही वाहने लवकरच लोकांना उपलब्ध होऊ शकतील असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
9 / 10
देशातील खासदारांनी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही गडकरींनी केले. त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात सांडपाण्याच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. हायड्रोजन हा लवकरच सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय असेल असं गडकरींनी सांगितले.
10 / 10
तसेच येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने होईल असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. भारतात येणारा काळ हा इलेक्ट्रिक मोबिलिटीचा, ग्रीन हायट्रोजनचा असेल असा दावा गडकरींनी केला.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPetrolपेट्रोल