शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदींनी उद्धाटन केलेल्या कॅक्टस गार्डनची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 3:46 PM

1 / 6
यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते. सरदार सरोवर धरणाजवळ बांधण्यात आलेल्या सफारी पार्कमध्ये लवकरच काही प्राणी आणले जाणार आहेत. तसेच, लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
2 / 6
नरेंद्र मोदींनी ज्या कॅक्टस गार्डनचे उद्धाटन केले आहे. त्या गार्डनमध्ये कॅक्टस झाडांच्या 450 जाती आहेत.
3 / 6
कॅक्टस गार्डनमध्ये असणाऱ्या कॅक्टस झाडांच्या जाती जास्तकरुन मलेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासमवेत इतर देशांतून आणल्या आहेत.
4 / 6
भारतात चंदीगड, बंगळुरु, हैदराबाद, कर्नाटक आणि ओडिसामधील कॅक्टस गार्डनवर रिसर्च केल्यानंतर या गुजरातमधील कॅक्टस गार्डनमध्ये या झाडांना आणले आहे.
5 / 6
तुम्ही आतापर्यंत फक्त हिरव्या रंगाचे कॅक्टसचे झाड पाहिले असेल. मात्र, याठिकी कॅक्टसच्या अनेक रंगबिरंगी जाती आहेत.
6 / 6
भारतात सर्वात मोठे कॅक्टर हाऊस चंदीगडमध्ये आहे. याठिकाणी कॅक्टसच्या जवळपास 277 जाती आहेत.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात