शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Unlock 1.0 : सोशल डिस्टंसिंग, मास्क आवश्यक; नियम मोडल्यास तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 6:29 PM

1 / 9
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
2 / 9
यातच आता देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र चालू ठेवण्यासाठी विविध राज्यांच्या सरकारने अनलॉक 1.0 लागू केले आहे. मात्र, त्यासाठी खबरदारी देण्यास सुद्धा सांगितले आहे.
3 / 9
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक 1.0 च्या नियमांचे उल्लंघन केल्यास दिल्ली सरकारकडून मोठा दंड आकारला जाणार आहे.
4 / 9
मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे, पार्टीचे आयोजन करणे, वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त लोकांना बसविणे, या सर्व गोष्टी आपल्याला महागात पडू शकतात.
5 / 9
उदाहरणार्थ, मास्क न लावता घराबाहेर पडल्या आपल्या एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मास्क लावला नाही तर 100 ते 1000 रुपयांपर्यंत दंड आहे.
6 / 9
विशेष म्हणजे, अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. मात्र, या कोरोना संकट काळात असे केल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. थुंकल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त भीती आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100 ते 1000 रुपयांपर्यंतचा आकारला आहे.
7 / 9
याचबरोबर, ज्यावेळी दिल्ली मेट्रो धावते. तेव्हा मेट्रोच्या आवारात थुंकल्यास 1000 पर्यंत दंड देखील आकारण्याची शक्यता आहे.
8 / 9
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार केली असेल आणि आपण त्याचे पालन केले नाही तर आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत आपल्याला 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा आणि 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
9 / 9
अनलॉक 1.0 मध्ये आपल्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्यास आपल्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या