शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वयाच्या ५व्या वर्षी आई-वडिलांना गमावलं! आता झाली मोठी अधिकारी; आयुष्याचा जोडीदारही IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 8:01 PM

1 / 10
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला असून अनेकांनी तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. काहींनी खडतर प्रवास करून यशाला गवसणी घातली, तर काहींनी गरिबीचा पराभव करत यश मिळवले.
2 / 10
अशीच एक कहाणी अंशिका जैनची आहे. अंशिकाने लहानपणीच आपल्या आई-वडिलांना गमावले. यूपीएससी परिक्षेची तयारी करत असताना आजीनं तिची कायमस्वरूपीसाठी साथ सोडली. एवढ्या कठीण काळातही अंशिकानं हिम्मत न हारता यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.
3 / 10
अंशिकाच्या या प्रवासात तिचा होणारा पती आयएएस वासू जैन यांनी तिला खूप साथ दिली. आता ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही लोकांचा संघर्ष लहानपणापासूनच सुरू होतो. असाच संघर्षमय प्रवास करत अंशिकाने यशाला गवसणी घातली.
4 / 10
अंशिका जैनचा होणारा पती वासू जैन हा पेशाने आयएएस अधिकारी आहे. अंशिकाच्या आजी-आजोबांनी तिला इथपर्यंत पोहचवण्यात खूप मेहनत घेतली पण आज आजी आपल्या नातीचं हे यश पाहण्यासाठी हयात नाही.
5 / 10
अंशिकाने यूपीएससीच्या परिक्षेत ३०६ वी रॅंक मिळवून अनेकांसमोर आदर्श ठेवला आहे. खरं तर तिनं पाचव्या प्रयत्नात हे यश मिळवलं. अंशिका मूळची दिल्ली येथील रहिवासी आहे.
6 / 10
तिनं वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आई-वडिलांना गमावले होते. त्यानंतर तिच्या आजीनं आणि काकांनी तिचा सांभाळ केला. २०१९ मध्ये UPSC परीक्षेच्या तयारीदरम्यान, अंशिकाच्या आजीचंही निधन झाले.
7 / 10
मग तिच्या काकांनी तिला पुढे जाण्यास मदत केली. चारवेळा अपयश आले तरी तिनं जिद्द कायम ठेवली अन् पाचव्या प्रयत्नात यश मिळवलं. तिचे होणारे पती वासू जैन हे २०२१ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी UPSC २०२० परीक्षेत ६७ वी रॅंक मिळवली.
8 / 10
वासू जैन सध्या बिलासपूर, छत्तीसगड येथे सेवेसाठी तैनात आहेत. वासू यांनी इंस्टाग्रामसह सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर अंशिकाची यशोगाथा शेअर केली आहे.
9 / 10
वासू जैन आणि अंशिका जैन २५ जून २०२३ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधीच यूपीएससीने दोघांनाही एक अप्रतिम भेट दिल्याचे अधिकारी वासू यांनी सांगितले.
10 / 10
अंशिकाला तिच्या रँकनुसार कदाचित आयएएस पद मिळणार नाही. मात्र, आयपीएस अधिकारी होऊन नागरी सेवेत रुजू होण्याचे तिचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीdelhiदिल्लीChhattisgarhछत्तीसगडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट