upsc mains exam IAS Himanshu Gupta success story upsc topper strategy chaiwala to ias
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; आधी IPS, नंतर IAS होऊन रचला इतिहास By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:54 PM1 / 11एखादी गोष्ट करण्याची मनात जर जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. IAS हिमांशू गुप्ता यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे.2 / 11IAS हिमांशू गुप्ता यांची प्रेरणादायी गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला जगण्याची, मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देते. संकटं आणि अडचणींमध्ये हार मानू नये असा सल्ला देते. 3 / 11हिमांशू गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज ७० किमी प्रवास केला. इतकंच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या दुकानात आणि मजूर म्हणूनही काम केलं.4 / 11उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता यांनी आपल्या मेहनतीने UPSC परीक्षा (UPSC Civil Service Exam) उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले.5 / 11ऑफिशियल ह्युमन ऑफ बॉम्बे वर प्रकाशित झालेली ही गोष्ट प्रत्येक उमेदवाराला प्रोत्साहन देते. यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ता यांचे पालक अत्यंत साधे आहेत.6 / 11वडील मजूर म्हणून काम करायचे. पैसे कमावण्यासाठी ते चहाची टपरी चालवत असे, पण त्यांनी नेहमीच आपल्या मुलांना शिक्षण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. 7 / 11वडील मजूर म्हणून काम करायचे. पैसे कमावण्यासाठी ते चहाची टपरी चालवत असे, पण त्यांनी नेहमीच आपल्या मुलांना शिक्षण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. 8 / 11त्याने २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. आणि त्यानंतर २०२० मध्ये तिसऱ्या प्रयत्नात भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.9 / 11'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर आपली गोष्ट सांगताना हिमांशू गुप्ता म्हणतात - 'मी शाळेत जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर माझ्या वडिलांसोबत काम करायचो.'10 / 11'एकदा कोणीतरी मला पाहिलं आणि मस्करी करायला सुरुवात केली. मला 'चायवाला' म्हटलं जाऊ लागले.'11 / 11मी त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना मदत केली आणि मग माझं स्वप्न साकार झालं.' आणखी वाचा Subscribe to Notifications