शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPSC Success Story: पदरात वारंवार अपयश पडूनही हार नाही मानली अन् बनला IAS टॉपर; वाचा जुनैदची प्रेरणादायी कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 5:52 PM

1 / 8
प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते. देशातील सर्वात मोठ्या परीक्षांमध्ये या परीक्षांचा समावेश होतो. अशात अनेक विद्यार्थी वारंवार मिळणाऱ्या अपयशानं खचून जातात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. पण एक जबरदस्त उदाहरण देशासमोर आयएएस अधिकारी जुनैद खान यानं निर्माण केलं आहे.
2 / 8
वारंवार पदरात अपयश पडूनही न डगमगता पुन्हा त्याच जोशानं आणि एकाग्रतेनं अभ्यास करणारेही अनेक विद्यार्थी देशात आहेत. आपल्या चुकांमधून शिकतो तोच समाजात सर्वोच्च स्थानी पोहोचतो असं म्हणतात आणि जुनैद खान याचं उत्तम उदाहरण ठरला आहे. जुनैद खान २०१८ सालच्या यूपीएससी परीक्षेचा देशात टॉपर होता. पण त्याच्या आजवरच्या प्रवासाची कहाणी खूप प्रेरणादायी राहिली आहे.
3 / 8
जुनैद यानं इंटरमीडिएटपर्यंतचं शिक्षण अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून केलं. त्यावेळी जुनैदला अभ्यासाची इतकी आवड नव्हती आणि त्यामुळेच तो एक सर्वसाधारण विद्यार्थी राहिला. इंटरमीडिएटनंतर त्यानं इग्नू येथून डिस्टेन्स लर्निंगच्या माध्यमातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पदवी शिक्षणाच्या अखेरच्या वर्षातच जुनैदनं यूपीएससीसाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं.
4 / 8
यूपीएससी परीक्षी उत्तीर्ण करण्याच्या स्वप्नानं त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. यूपीएससीची तयारी करण्यासाठी जुनैदनं जामिया रेजिडेंन्शियल कोचिंगमध्ये प्रवेश घेतला. इथं जुनैदनं खूप मेहनत घेऊन अभ्यास केला. यात जुनैदला अनेक अडचणींना देखील सामोरं जावं लागलं.
5 / 8
जुनैद अहमद सलग तीनवेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाले होते. यावेळी अजिबात खचून न जाता त्यांनी चौथ्यांदा पुन्हा एकदा प्रयत्न केला. चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं खरं पण देशात ३५२ वी रँक त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांना आयआरएस सेवा मिळाली. पण ते इथवर थांबले नाहीत.
6 / 8
जुनैद यांनी पाचव्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पुन्हा शून्यापासून सुरुवात करत कठोर मेहनत घेतली आणि यावेळी जुनैद यांना देशातून तिसरा क्रमांक पटकावला. नापास विद्यार्थी ते देशात थर्ड रँक इथवरचा जुनैद यांचा प्रवास दिसायला सोपा वाटत असला तरी त्यामागे त्यांनी घेतलेली कठोर मेहनत आहे.
7 / 8
सलग तीनवेळा प्रयत्न करुनही उत्तीर्ण होऊ न शकल्यानं अनेकांची बोलणी त्यांना खावी लागली होती. तसंच अनेकांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवून तुझ्याकडून हे काही शक्य नाही असं वारंवार त्यांना सांगितलं गेलं. पण स्वत:वर प्रबळ विश्वास असलेल्या जुनैद यांनी आज सर्वांना खोटं ठरवून दाखवलं.
8 / 8
यूपीएससीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी घाबरण्याची काहीच गरज नाही असं जुनैद आज परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना मोठ्या विश्वासानं सांगतात. परीक्षेसाठी तयारी करत असताना तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी इतरांसारखी खूप दांडगी नाही याचा विचार करत बसू नका, असाही ते सल्ला देतात. सर्वात आधी पाया मजबूत करण्यावर प्रत्येकानं भर द्यायला हवा आणि केवळ पुस्तकी अभ्यासावर भर देऊ नका, असंही ते म्हणतात.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग