By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 11:15 IST
1 / 10मैत्रीचे दावे करणाऱ्या अमेरिकनं भारताला मोठा धक्का दिला आहे. भारतात जाऊ नका, असा सल्ला अमेरिकनं आपल्या नागरिकांना दिला आहे.2 / 10कोरोनाचा वाढता कहर, गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे अमेरिकन नागरिकांनी भारतात जाऊ नये, अशा सूचना ट्रम्प प्रशासनानं दिल्या आहेत. 3 / 10अमेरिका आपल्या देशातील नागरिकांसाठी प्रवासाच्या दृष्टीनं योग्य असलेल्या देशांना रेटिंग देते. त्यात भारताला सर्वात खराब रेटिंग देण्यात आलं आहे.4 / 10अमेरिकेनं भारताला ४ रेटिंग दिलं आहे. युद्धग्रस्त सीरिया, दहशतवादाचं केंद्रस्थान असलेला पाकिस्तान, अस्थिरतेचा सामना करणारे इराण, इराक आणि येमेनलाही हेच रेटिंग दिलं गेलं आहे.5 / 10भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याशिवाय अपराध आणि दहशतवाददेखील वाढत आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळेच नागरिकांनी भारतात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.6 / 10भारतात महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे, असंदेखील अमेरिकेनं नागरिकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.7 / 10मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी भारत सरकारनं अमेरिकन सरकारनं दबाव आणावा, अशी विनंती भारतीय पर्यटन आणि आदरातिथ्य संघानं (फेथ) केली आहे.8 / 10भारत सरकारनं तातडीनं यामध्ये लक्ष घालावं आणि देशाची नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊ देऊ नये, असं फेथनं म्हटलं आहे. 9 / 10आधीच कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय संकटात आहे. भारतात पुन्हा एकदा पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अमेरिकन सरकारच्या नियमावलीमुळे त्याला धक्का बसू शकतो, असं फेथनं भारत सरकारला सांगितलं आहे.10 / 10अमेरिकनं २३ ऑगस्टला नागरिकांसाठी नियमावली जारी केली. त्यात भारताचा समावेश थेट पाकिस्तान, सीरिया, येमेन, इराण आणि इराकच्या गटात करण्यात आला. हा भारतासाठी मोठा झटका मानला जात आहे.