us lockheed martin wants to deliver mh 60 romeo helicopters to india soon amid face off with china
राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 8:47 PM1 / 10पूर्व लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव वाढल्यानं भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. फ्रान्समधून निघालेली ५ राफेल विमानं हरयाणाच्या अंबाला हवाई तळावर दाखल झाली आहेत. 2 / 10राफेल भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानं भारताचं सामरिक सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेता राफेल विमानांना अंबाला हवाई तळावर तैनात करण्यात आलं आहे.3 / 10राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढलं असताना लवकरच नौदलही आणखी अत्याधुनिक होणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच MH-60-Romeo हेलिकॉप्टर्स दाखल होणार आहेत. 4 / 10भारतानं अमेरिकेसोबत रोमियो हेलिकॉप्टर्ससाठी करार केला आहे. चीनसोबत निर्माण झालेला पाहता रोमियो हेलिकॉप्टर्सचा ताबा लवकरच भारताला देण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे.5 / 10दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. हिंदी महासागरात चिनी नौदलाचं प्राबल्य वाढलं आहे. या भागात चिनी पाणबुड्या मोठ्या प्रमाणात गस्त घालत असतात. 6 / 10हिंदी महासागरात भारतीय नौदलासमोर चीननं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळेच अमेरिकेनं रोमियो हेलिकॉप्टर्सची डिलेव्हरी लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणबुड्यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता रोमियोमध्ये आहे. 7 / 10परदेशी मिलिट्री सेलच्या माध्यमातून रोमियो हेलिकॉप्टर्सची विक्री केली जाणार असल्याची माहिती लॉकहिड मार्टिनचे अधिकारी विल्यम एल. ब्लेयर यांनी दिली. लॉकहिड मार्टिन कंपनीकडून रोमियो हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाते. 8 / 10'आम्ही लवकरात लवकर रोमियो हेलिकॉप्टर्स भारताला सोपवू. पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारताला रोमियो हेलिकॉप्टर्स मिळतील,' अशी माहिती ब्लेयर यांनी दिली.9 / 10लॉकहिड मार्टिनकडून २४ रोमियो हेलिकॉप्टर्स घेत असल्याची घोषणा फेब्रुवारीत करण्यात आली. हिंदी महासागरात चिनी पाणबुड्यांची सक्रियता वाढत आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं रोमियो हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 10 / 10रोमियोची खरेदी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राफेलमुळे हवाई दल आणखी सुसज्ज झालं असताना आता रोमियोमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications