Use this trick while driving, the car will never get scratched
Car Driving: ड्रायव्हिंग करताना वापरा ही ट्रिक, कारवर कधीही येणार नाही स्क्रॅच By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 7:46 PM1 / 5गाडी नवी असो वा जुनी, आपली कार नेहमीच चकाकती राहिली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असते. मात्र रस्त्यावरून जर कुठलंही वाहन चालत असेल तर त्यावर छोटे-मोठे स्क्रॅच हे येतातच. गाडीवर पडलेला छोटासा स्क्रॅचसुद्धा गाडीचं सौंदर्य बिघडवून टाकतो. तसेच हा स्क्रॅच काढण्यासाठी खर्च होतो तो वेगळाच. मात्र इथे आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या कारवर कुठलाही स्क्रॅच येणार नाही. 2 / 5 सर्वसाधारणपणे गाडीला कुठलाही अपघात तेव्हा होतो, जेव्हा गाडी खूप वेगात असते. त्यामुळे नेहमी आपली कार एका मर्यादित वेगाने चालवा. घाई गडबडीत तुमचं आणि तुमच्या कारचं नुकसान होऊ शकतं. 3 / 5जेव्हा तुम्ही रस्त्यावर गाडी ड्राइव्ह करत असाल, विशेषकरून महामार्गावर कार चालवत असताना आपल्या लेनमधूनच कार चालवा अचानक लेन बदलल्यास मागून येणारी गाडी तुम्हाला टक्कर देऊ शकते. 4 / 5भारतामध्ये नेहमी लोक आपली गाडी वळवताना इंडिकेटर्सचा वापर करायला विसरतात. ही चूक टाळली पाहिजे. जेव्हा गाडी अन्य लेनमध्ये घेऊन जात असताना किंवा वळवताना इंडिकेटर्सचा वापर करा, तसेच हॉर्नसुद्धा वाजवा. 5 / 5नेहमी पाहण्यात येते की, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर स्क्रॅच येतात. त्यामुळे नेहमी आपली कार सुरक्षित ठिकाणी पार्क करा. मोकळ्या जागी कार पार्क करण्यापेक्षा कुठल्यातरी रुफच्या खाली कार पार्क करणे योग्य ठरेल. आणखी वाचा Subscribe to Notifications