महापोल! योगींच्या लोकप्रियतेचा 'जलवा'; यूपीत पुन्हा पूर्ण बहुमतात येणार भाजप सरकार, जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:53 IST
1 / 9उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि समाजवादी पक्ष (एसपी) आमनेसामने आहेत. सर्वच पक्षांनी आपापल्या बहुतांश उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याचबरोबर सर्वेक्षण संस्थांचे अहवालही पुढे येत आहेत. यांत योगी आदित्यनाथांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. विविध एजन्सींनी केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश लोक त्यांच्या कामावर खूश असल्याचे दिसते. यामुळेच ते पुन्हा एकदा यूपीची कमान योगींच्या हाती देण्यास तयार असल्याचे दिसत आहे.2 / 9या वर्षी उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 1,74,351 असून सुमारे 15 कोटी मतदार या निवडणुकीत मतदानासाठी पात्र असतील. जाणून घेऊयात निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांचे निकाल...3 / 9टाईम्स नाऊ-व्होटो ओपिनियन पोल - मतदान सर्वेक्षणानुसार, भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सुमारे 212-231 विधानसभा सीट्स जिंकण्याची अपेक्षा आहे. तसेच समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला 147-158 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर बसपा 10-16, काँग्रेस 9-15 आणि इतरांना 2-5 जागांवर विजय मिळू शकतो.4 / 9एबीपी न्यूज-सी व्होटर ओपिनियन पोल - उत्तर प्रदेशात एबीपी न्यूज-सी व्होटरने घेतलेल्या ओपिनियन पोलच्या निकालात भाजपला यावेळी 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाला 145 ते 157 जागा मिळू शकतात. बसपाच्या खात्यात 8 ते 16 जागा जात आहेत. सर्वेक्षणानुसार काँग्रेसला अवघ्या 3 ते 7 जागांवरच समाधान मानावे लागू शकते.5 / 9इंडिया टीव्ही ओपिनियन पोल - सर्वेक्षणानुसार, भाजप 242 ते 244 जागा, सपा 148 ते 150 जागा, बसपा 4 ते 6 जागा, काँग्रेस 3 ते 5 जागा आणि इतरांना 1 ते 3 जागा मिळू शकतात.6 / 9झी ओपिनियन पोल - झी न्यूज ओपिनियन पोलनुसार, भाजपा+ला 245-267 जागा आणि एसपी+ला 125-148 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच मायावतींच्या बसपाला 5 ते 9 जागांवर विजय मिळू शकतो आणि काँग्रेसला 3 ते 7 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना 2-6 जागा मिळण्याची शक्यता आहे.7 / 9रिपब्लिक-पी मार्क ओपिनियन पोल - उत्तर प्रदेशात रिपब्लिक-पी मार्कने घेतलेल्या निवडणूकपूर्व ओपिनियन पोलनुसार, भाजपला 252-272 जागा मिळू शकतात. दुसरीकडे समाजवादी पक्षाला पुन्हा विरोधी पक्षातच बसावे लागू शकते. सपाच्या खात्यात 111-131 जागा जाताना दिसत आहेत. सर्वेक्षणात बसपा आणि काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे. मायावतींच्या पक्षाला केवळ 8-16 जागांवर समाधान मानावे लागू शकते, तर काँग्रेसच्या खात्यात केवळ 3-9 जागा जाण्याची शक्यता आहे.8 / 9ओपिनियन पोलवर बंदी घालण्याची मागणी - समाजवादी पक्षाने आणि राष्ट्रीय लोक दलानेही (RLD) निवडणूक आयोगाकडे जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामुळे मतदारांवर परिणाम होतो, असा आरोप त्यांनी केला आहे. 9 / 9आरएलडीचे राष्ट्रीय सचिव अनिल दुबे यांनी नुकतीच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. यापूर्वी समाजवादी पक्षानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेत ओपिनियन पोलवर बंदी घालण्याची मागणी केली होती.