uttar pradesh assembly election 2022 updates bjp loses six leaders in 48 hours gains two mlas
UP Election : ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांचा राजीनामा, तर दुसऱ्या पक्षातून दोघांची एन्ट्री By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 10:13 AM1 / 9UP Election : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या (Uttar Pradesh Elections 2022) तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपला गेल्या दोन दिवसांत एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले. अशातच बुधवारी ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 2 / 9गेल्या दोन दिवसांत राजीनामा देणारे दारा सिंग हे सहावे नेते आहेत. मात्र, यादरम्यान काँग्रेसचे (Congress) एक आमदार आणि सपाच्या (SP) एका आमदारानेही भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.3 / 9उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू होती, त्याचदरम्यान मंगळवारी कॅबिनेट मंत्री आणि मोठे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.4 / 9याशिवाय भाजपचे आमदार अवतार सिंह भडाना यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला. त्याचवेळी मौर्य समर्थक समजल्या जाणाऱ्या तीन आमदारांनीही राजीनामे देणार असल्याची घोषणा केली.5 / 9मंगळवारी मौर्य यांच्यानंतर भाजपचे तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे आमदार रोशन लाल वर्मा आणि बिल्हौरचे आमदार भगवती सागर यांनीही राजीनामा दिला. मात्र, याच दरम्यान काँग्रेसचे आमदार नरेश सैनी आणि सपा आमदार हरि ओम यादव यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. हरी ओम यादव हे मुलायम सिंह यादव यांचे नातेवाईक आहेत.6 / 9लोकसंख्येच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहेच. पण राजकीय दृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ४०३ जागांसाठी मतदान होईल.7 / 9मतदान प्रक्रिया ७ टप्प्यात पार पडणार आहे. यात अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.8 / 9उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेशात ४०४ विधानसभा आणि विधान परिषदेत १०० सदस्य असतात. उत्तर प्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर मुख्य विरोधी पक्षात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा समावेश आहे. 9 / 9२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं ३१२ जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मतं मिळाली होती. तर समाजवादी पक्षानं ४७ आणि बहुजन समाज पक्षानं १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या झाल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications