शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh: यूपीत बुलडोझरनंतर आता डायनामाइटची एंट्री, स्फोटकांनी पाडणार गुन्हेगारांची घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 9:54 PM

1 / 7
लखनौ: उत्तर प्रदेशातील योगी सरकारने गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर चढवण्यात आले आहेत. पण, आता या गुन्हेगारांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई होताना दिसणार आहे.
2 / 7
आतापर्यंत उत्तर प्रदेशात गुन्हेगारांची घरे पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात होता, मात्र आता यासाठी डायनामाईटचा वापर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भूमाफियांची घरे डायनामाइटच्या माध्यमातून पाडण्यात येणार आहेत.
3 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये उंच आणि मोठ्या इमारती पाडण्यासाठी डायनामाइटचा वापर केला जाणार आहे. बुलडोझरच्या सहाय्याने मोठ्या इमारती पाडण्यात बराच वेळ वाया जातो. यासाठी तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
4 / 7
त्यामुळे आता लखनौ विकास प्राधिकरणाने मोठ्या इमारती पाडण्यासाठी डायनामाइटचा वापर करण्याची योजना आखली आहे. यासाठी भोपाळहून एक तज्ज्ञांची टीम बोलवण्यात येत आहे.
5 / 7
लखनौ डेव्हलपमेंट अथॉरिटीचे व्हीसी अक्षय त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, छोट्या इमारती बुलडोझरद्वारे सहजपणे पाडल्या जातात. मात्र मोठी इमारत पाडण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे आता या कामासाठी डायनामाइटचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 / 7
नुकतीच मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सूचनेवरून रीवा येथे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या पथकाच्या उपस्थितीत मोठी कारवाई करण्यात आली. बदमाश विजय पटेल याचे घर पाडण्यात आले.
7 / 7
विजय पटेल याच्या घरावर कारवाई केल्यानंतर प्रशासनाने त्याचे वडील इंद्रलाल पटेल याच्या घराचा काही भागही पाडला. त्याचवेळी घराचा उर्वरित भाग डायनामाइटने पाडण्याचे आदेश देण्यात आले.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ