शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 8:18 PM

1 / 10
विजेचे पोल लावणारा एक मजूर रात्री झोपला असता त्याच्या शर्टमध्ये एक कोब्रा जातीचा विषारी साप घुसला आणि नंतर तो त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये गेला. यानंतर संबंधित मजुराला जाग आली आणि त्याने संपूर्ण रात्र, एका खांबाला धरून काढली.
2 / 10
आपल्या पॅन्टमध्ये साप घुसल्याचे समजल्यानतंर, हालचाल झाली, तर साप चावेल या धाकाने हा युवक रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत कसल्याही प्रकारची हालचाल न करता खांबाला धरून उभा राहिला. ही भयावह घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात घडली. (सांकेतिक फोटो.)
3 / 10
मिर्झापूर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. येथे एका अंगणवाडी केंद्रावर, जवळच्याच परिसरात विजेचे पोल लावण्याचे काम करणारे विद्युत विभागाचे काही मजूर थांबले होते. (सांकेतिक फोटो.)
4 / 10
रात्रीच्या वेळी हे सर्व मजूर जेवन अटोपून झोपले. याच दरम्यान एक मजूर लवलेश कुमार याच्या शर्टमध्ये विषारी साप घुसला आणि नंतर तो त्याच्या जीन्समध्ये गेला.
5 / 10
पॅन्टमध्ये साप गेल्याचे समजताच हा युवक उठला आणि जवळील खांबाला धरून शांतपणे तब्बल 7 तास उभा राहिला. या वेळात विषारी साप त्याच्या जीन्स पॅन्टमध्येच बसून होता. (सांकेतिक फोटो.)
6 / 10
सकाळ झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी एका सर्पमित्राला बोलावले. यानंतर संबंधित युवकाच्या पॅन्टमधून साप बाहेर काढण्यात आला आणि युवकाचा जीव वाचला. (सांकेतिक फोटो.)
7 / 10
साप चावण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी तो काढण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर युवकाची पॅन्ट कापून तो साप तकाढण्यात आला.
8 / 10
गावातील नागरिकांनी सांगितले, की संबंधित युवक रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 7 तास खांबाला धरून उभा होता. तेव्हा कुठे त्याचा जीव वाचला. युवकाचे नशीब चांगले, की या सापाने युवकाला दंश केला नाही. (सांकेतिक फोटो.)
9 / 10
ग्रामपंचायत सदस्य महेश सिंह यांनी सांगितले, की रात्रीच्या वेळी एक साप युवकाच्या शर्टमधून पॅन्टमध्ये घुसला. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत हा युवक खांबाला धरून उभा होता. सकाळी सर्पमित्राला बोलावण्यात आले. तेव्हा कुठे संबंधित युवकाच्या पॅन्टमधून साप निघाला. (सांकेतिक फोटो.)
10 / 10
यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. (सांकेतिक फोटो)
टॅग्स :snakeसापUttar Pradeshउत्तर प्रदेशLabourकामगार