By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 15:22 IST
1 / 8नागाला मारल्यानंतर नागीन बदला घेते, अशा आशयाचे अनेक चित्रपट आपण बघितले असतील. पण, प्रत्यक्षात असे काही पाहिले आहे? जर तुमचे उत्तर नाही असेल, तर ही बातमी तुम्हाला हैराण केल्याशिवाय राहणार नाही. (Naagin Revenge). (सर्व फोटो प्रतिकात्मक) 2 / 8माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, उत्तर प्रदेशातील बहराइचमधील चिलबिला गावात अशीच घटना घडली आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे, की नाग पंचमीच्या दिवशी नागाला मारल्यानंतर, नागिनीने गावात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.3 / 8या गावात नाग पंचमीनंतर आतापर्यंत तब्बल 26 जणांना नागिनीने दंश केला आहे. यामुळे येथील लोक प्रचंड धास्तावलेले आहेत. 4 / 8स्थानिक नागरिकांनी सांगितले, की या दिवसात शेत पाण्याने भरले जाते. यामुळे विषारी साप निघतात. यातच लोकांना हा नाग दिसला. यानंतर त्या लोकांनी या नागाची हत्या केली. 5 / 8यानंतर ग्रामस्थांना समजले, की पंचमीच्या दिवशी मारण्यात आलेला नाग हा गावातीलच मंदिरात राहणाऱ्या नाग-नागिनीच्या जोड्यातील होता.6 / 8या लोकांचे म्हणणे आहे, की ज्या लोकांना नागीन दंश करते त्यांना ती दिसत नाही. कारण त्यांना झोपेतच सापाने दंश केल्याचे समजते. 7 / 8गावात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लोकांनी घाबरू नये, जर सापाने कुणाला दंश घेतलाच, तर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 8 / 8गावात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लोकांनी घाबरू नये, जर सापाने कुणाला दंश घेतलाच, तर त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.