शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Uttarakhand glacier burst : उत्तराखंडमध्ये महाप्रलय; 10 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता, बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 6:12 PM

1 / 10
उत्तराखंडमधील चमोली येथे आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. तसेच, हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे.
2 / 10
याचबरोबर, हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे भारतीय लष्कराला सीमाभागाशी जोडणारा धौलीगंगेवरील पूलही या दुर्घटनेत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. तपोवन धरणाजवळ बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे.
3 / 10
सीमाभागातील मलारीला जोडणारा पूल हिमकडा कोसळल्याने वाहून गेला आहे. हा पूल लष्काराला सीमाभागांशी जोडतो. पूल वाहून गेल्याचे वृत्त समजताच लष्कराकडून आयटीबीपीच्या २०० जवानांना जोशीमठ परिसरात पाठवण्यात आले आहे.
4 / 10
आटीबीपीच्या एक टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंडमधील रैनी, अलकनंदा या परिसरात मोठा हाहाकार उडाला आहे. आईटीबीपीचे अधिकारी एसएस देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळी 250 जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे. या दुर्घटनेत 9 ते 10 नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत.
5 / 10
नंदादेवी ग्लेशियरचा कडा कोसळल्याने धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांना मोठा पूर आला. पाण्याच्या तडाख्यात ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणीही प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.
6 / 10
जोशीमठ येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकल्पासाठी काम करत असलेले सुमारे १०० ते १५० कामगार बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे.
7 / 10
हिमकडा कोसळल्यांनंतर गंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या लोकांना नदीपासून लांब राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
8 / 10
याशिवाय, उत्तराखंडमधील दुर्घटनेनंतर उत्तराखंड सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. 1070 आणि 9557444486 असे दोन हेल्पलाइन क्रमांक आहेत. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी 9557444486 हा हेल्पालाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
9 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यासंदर्भात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच शक्य ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
10 / 10
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची दखल घेतली असून आवश्यक अशी सर्व मदत केंद्र सरकार करणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री रावत यांच्याशी बोलणे झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले. तसेच, देवभूमीतील लोकांना वाचवण्यासाठी आणि मदतकार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही अमित शहा म्हणाले.
टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा