शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Uttarakhand glacier burst: उत्तराखंड दुर्घटना हिमकडा कोसळून नाही, त्रिशूळ पर्वतामुळे; सॅटेलाईट फोटो आले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 9:22 PM

1 / 10
उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे.
2 / 10
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगेरीचे जिओलॉजिस्ट आणि ग्लेशियर एक्सपर्ट डॉक्टर डैन शुगर यांनी प्लॅनेट लॅबच्या सॅटलेईट इमेज तपासल्या आहेत. त्यांनी सांगितले की, चमोली दुर्घटना ग्लेशियर तुटल्याने नाही, तर त्रिशूळ पर्वतावर झालेल्या भूस्खलनामुळे खालच्या हिमकड्यांवर दबाव पडल्याचा दावा केला आहे.
3 / 10
प्लॅनेट लॅबच्या सॅटेलाईट फोटोंवरून हे दिसत आहे. जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा त्रिशूळ पर्वतावर खूप धुळीचे ढग दिसत आहेत. घटनेच्या आधीचे आणि नंतरचे फोटो पाहिल्यानंतर यातील अंतर स्पष्ट दिसते. माती घसरून खाली आली आणि त्यानंतर महाप्रलय आला.
4 / 10
डॉ. शुगर यांनी सांगितले की, ग्लेशियरच्या वर W आकाराचे भूस्खलन झाले आहे. ज्यामुळे वरती असलेला हिमकडा वेगाने खाली कोसळला. आदीच्या अंदाजांनुसार ग्लेशिअर तुटल्याने प्रलय आल्याचे सांगितले जात होते. तिथे कोणताही तलाव बनला नव्हता.
5 / 10
त्रिशुळ पर्वतावर घटनेच्या आधी एल आकाराची धूळ हवेत उडाल्याची दिसली. सॅटेलाईट फोटोंमध्ये तिथे कोणत्याही प्रकारचे पाणी साचलेले नव्हते. हा भूस्खलनाचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.
6 / 10
सॅटेलाईट इमेज एक्स्पर्टनी घटनेच्या आधारावर थ्रीडी इमेज बनविली आहे. यामध्ये या भागातील माती, दगड मोठ्या प्रमाणावर बर्फाच्छादीत भागावर पडले, यामुळे वेगाने हिमस्खलन झाले. यामुळे खाली प्रलय आला, असे ते म्हणाले.
7 / 10
हे फोटो कॉपरनिकस सेंटीनल २ या सॅटेलाईटने घेतलेले आहेत. नंदा देवी ग्लेशिअरच्यावर मोठी भूभाग तुटल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे 5 फेब्रुवारीला जो चीर दिसला तो 6 फेब्रुवारीला दिसला नाही असे आणखी एक संशोधक बॉब ओ मैकनैब यांनी ट्विट केले आहे.
8 / 10
या सर्व दाव्यांवरून नंदा देवी ग्लेशिअरच्या वर त्रिशूळ पर्वतावर भूस्खलन झाल्याचे स्पष्ट होत आहे. जवळपास 2 लाख स्के मीटर एवढा मोठा बर्फ यामुळे प्रभावित झाला आणि दोन किमी खाली कोसळला. याचे रुपांतर चिखल, दगडांमध्ये झाले आणि प्रलय आला.
9 / 10
ही दरड खाली असलेल्या नंदा देवी ग्लेशिअरवर कोसळली आणि दबाव वाढल्याने ग्लेशिअर 3.5 किमी खाली कोसळला. यामुळे अचानक ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांमध्ये पूर आला.
10 / 10
भूस्खलनाचे तज्ज्ञ त्रिशूळ पर्वतावर झालेल्या भूस्खलनाला कारण मानत आहेत. असाच प्रकार 2012 मध्ये नेपाळच्या सेती नदीमध्ये झाला होता. चमोलीतील दुर्घटनादेखील ग्लेशिअल तुटल्याने झालेली नाही.
टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा