शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Uttarakhand glacier burst : उत्तराखंडच्याच शास्त्रज्ञांनी ८ महिन्यांपूर्वी इशारा दिलेला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 8:51 PM

1 / 10
चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मोठे नुकसान झाले असून गंगा नदीला महापूर आला आहे. या दुर्घटनेत 176 हून अधिक कामगार बेपत्ता असून आतापर्यंत 16 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर 7 जणांचा मृतदेह सापडला आहे.
2 / 10
धक्कादायक बाब म्हणजे उत्तराखंडच्याच वैज्ञानिकांनी तब्बल 8 महिन्यांपूर्वी इशारा दिला होता. उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागांत असे बर्फ आहेत जे कधीही तुटू शकतात. यासाठी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या काराकोरममधील श्योक नदीचे उदाहरण दिले होते.
3 / 10
श्योक नदीचा प्रवाह एका हिमखंडाने रोखला आहे. यामुळे तिथे तलाव बनले आहे. पाण्याचा दबाव वाढला तर तो हिमखंड फुटेल, असा इशारा देहरादूनच्या वाडिया इंस्टीट्यूट ऑफ जियोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी दिला होता. संपूर्ण हिमालय क्षेत्रात असे छोटे मोठे तलाव तयार झाले आहेत आणि ते खूप धोकादायक अवस्थेत आहेत.
4 / 10
2013 च्या दुर्घटनेनंतर हे शास्त्रज्ञ हिमालयावरील परिस्थितीवर संशोधन करत आहेत. 2013 मध्येही उत्तराखंडमध्येच भीषण हिमस्खलन झाले होते.
5 / 10
वैज्ञानिकांनी श्योक नदीवर आणि हिमालयातील नद्यांवर जे संशोधन केले ते इंटरनॅशनल जर्नल ग्लोबल आणि प्लेनेटरी फोटोजमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात जगविख्यात जियोलॉजिस्ट प्रोफेसर केनिथ हेविट यांनीदेखील मदत केली आहे.
6 / 10
या संशोधनामध्ये वाडियाचे संशोधक डॉ. राकेश भांबरी, अमित कुमार, अक्षय वर्मा आणि समीर तिवारी यांचा सहभाग होता. त्यांनी 2019 मध्ये हिमालय क्षेत्रातील नद्यांचा प्रवाह रोखण्यासंबंधी ग्लेशिअर, आईस डॅम आणि आउटबर्स्ट फ्लड एंड मूवमेंट हेट्रोजेनेटी ऑफ ग्लेशियरवर संशोधन केले आहे.
7 / 10
या संशोधनात त्यांना हिमालयीन क्षेत्रात असे 145 तलाव फुटलेले आढळले आहेत. यामध्ये हे हिमकडे वेगाने वितळत आहेत. तर दुसरीकडे पाकव्याप्त काराकोरम क्षेत्रात बर्फ वाढू लागला आहे. हा बर्फ जेव्हा मोठा होतो तेव्हा तो नद्यांचा प्रवाह रोखतो.
8 / 10
या हिमकड्यांचा वरच्या बाजुचा बर्फ वेगाने खाली कोसळू लागतो. भांबरी यांनी लिहिले की, हिमालच्या हिमकड्यांवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा खालच्या भागाला मोठे नुकसान होणार आहे. ते वाचविता येईल.
9 / 10
हा इशारा उत्तराखंड सरकार आणि केंद्र सरकारलाही देण्यात आला होता. 145 पैकी 30 मोठ्या घटना होत्या. मात्र, त्याखाली लोकवस्ती नसल्याने त्याचे परिणाम दिसून आले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
10 / 10
सध्या 22-23 जून 2020 आणि 29 मे 2020 मध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे असेच मोठे बर्फ बंधारे बनले आहेत. ते कधीही फूटू शकतात असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. मात्र, त्यांच्य़ाकडे यावर काही उपाय नाहीय.
टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा