शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pushkar Singh Dhami: फ्लावर नहीं फायर हैं! पराभूत होऊनही पुष्कर धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री; पाहा, ५ मोठी कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:10 AM

1 / 9
अलीकडेच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. यापैकी उत्तराखंडमध्येही जनतेने भाजपच्या पारड्यात दान टाकून पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
2 / 9
मात्र, या निवडणुकीत भाजपचा चेहरा असलेले आणि दोन मुख्यमंत्री बदलल्यानंतर पक्षाने संधी दिलेले पुष्कर सिंह धामी या निवडणुकीत पराभूत झाले. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदावर असलेली व्यक्ती निवडणूक जिंकत नाही, असा पायंडाच आहे.
3 / 9
पुष्कर सिंह धामी पराभूत झाल्यानंतर भाजप त्यांनाच पुन्हा संधी देणार की, नवीन चेहरा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, भाजप आमदारांच्या झालेल्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांनाच एकमताने पुन्हा मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब झाले.
4 / 9
भाजपची नवीन संस्कृती उदयाला येत असून, पराभूत झालेल्यांनाही पक्ष पुन्हा संधी देत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, पुन्हा एकदा पुष्कर सिंह यांच्यावर विश्वास दाखवण्यामागे ५ महत्त्वाची कारणे असल्याचे सांगितले जाते.
5 / 9
उत्तराखंडची निवडणूक पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. धामी यांनी निवडणूक हरली असली तरी भाजपचे सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाने दोन मुख्यमंत्री बदलल्यामुळे भाजपविरोधात जनतेत मोठी नाराजी होती. असे असूनही धामी यांनी पकड सैल होऊ दिली नाही.
6 / 9
पुष्कर सिंह धामी ४६ वर्षांचे असून, भाजपला युवा नेतृत्वाला संधी द्यायची होती. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेताच धामी यांनी अल्पावधीत चांगली लोकप्रियता कमावली. त्यामुळे पक्षाचा विश्वास वाढला. भाजपला उत्तराखंडमध्ये पुढील पिढी तयार करायची असल्यानेही धामी यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
7 / 9
भाजप संकटात असताना उत्तराखंडात पक्ष आणि नेतृत्वाची चांगली प्रतिमा करण्यात पुष्कर सिंह धामी यांना यश आले. याशिवाय पुष्कर सिंह धामी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आले.
8 / 9
सन २०१७ मध्ये उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतर दोनवेळा मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की भाजपवर आली. यानंतर धामी यांना संधी देण्यात आली. धामी यांनी संधीचे सोने करत पक्ष नेतृत्वावरील विश्वास सार्थ ठरवला.
9 / 9
उत्तराखंडमधील राजकीय समीकरणाचा मूड समजून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुष्कर सिंह धामी यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. धामी पहाडी भागातील ठाकूर समाजातून आलेले आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी निवडून देऊन भाजपने जातीय आणि प्रादेशिक समीकरणांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडBJPभाजपाPoliticsराजकारण