शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 9:02 AM

1 / 9
मुंबई : देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढत होताना दिसत आहे. कोरोना संसर्गाच्या या लढाईत लस हे एक मोठे हत्यार मानले जात आहे. सरकारने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे. मात्र, अद्याप लसीच्या किंमतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
2 / 9
खासगी क्षेत्राला 250 रुपयांना देण्यात आलेल्या लसीची किंमत सहापट वाढली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) कोव्हिशिल्ड लसची (Covishield Vaccine) किंमत 700 ते 900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर भारत बायोटेकने (Bharat Biotech) विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनची (Covaxin) किंमत 1250 वरून 1500 पर्यंत गेली आहे.
3 / 9
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, CoWIN वेबसाइटवरून असे दिसून आले आहे की, या खाजगी क्षेत्रातील कोरोना लसीकरणाच्या चार मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांची नावे समोर आली आहे, यामध्ये अपोलो, मॅक्स, फोर्टिस आणि मनिपाल रुग्णालयांचा समावेश आहे.
4 / 9
जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोना लसीच्या किंमतीबद्दल एकसारखेपणा नाही, भारत देखील त्या देशांपैकी एक आहे. कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहाता देशातील मोठा हिस्सा कोरोना लसीकरणासाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला तयार नाही.
5 / 9
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतातील खासगी क्षेत्रातील लसीची वाढती किंमत. भारतातील कोव्हिशिल्डचा एक शॉट घेण्यासाठी जवळपास 12 डॉलर्स आणि कोव्हॅक्सिनसाठी 17 डॉलर्स द्यावे लागत आहेत. ज्यावेळी भारतात लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली, त्यावेळी केंद्र सरकार लसीच्या दोन डोससाठी फक्त 150 रुपये देत होते आणि राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना पुरवठा करत होते.
6 / 9
एवढेच नव्हे तर खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रति डोस 100 रुपये घेण्याची परवानगी देण्यात आली होती. खासगी रुग्णालयांनीही यावर सहमती दर्शविली होती. दरम्यान, काही रुग्णालये लसीकरण शुल्क म्हणून कोव्हिशिल्ड लसीसाठी 250 ते 300 रुपये प्रति डोस शुल्क आकारत आहेत.
7 / 9
मॅक्स हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत कोव्हिशिल्डची किंमत 660-670 रुपये होती, त्यात जीएसटी आणि इतर खर्चाचा समावेश होता. ज्यावेळी लस मागविली जाते त्यावेळी ती 5 ते 6 टक्के खराब होते, अशा परिस्थितीत लसीची किंमत 710 ते 715 पर्यंत होते.
8 / 9
याव्यतिरिक्त, जे कर्मचारी नागरिकांना लस देतात, त्यांना पीपी किट, सॅनिटायझर, बायोमेडिकलची व्यवस्था करावी लागते, त्यासाठी 170 ते 180 रुपयांपर्यंत खर्च येतो, अशात एका लसची किंमत 900 रुपयांपर्यंत जाते. तसेच, रुग्णालयांना ही लस किती रुपयांना दिली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही प्रवक्त्याने सांगितले.
9 / 9
भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस 1,200 रुपये निश्चित केली होती, तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रति डोस 600 रुपये किंमतीची घोषणा केली होती, परंतु दोन्ही कंपन्या आता दुप्पट किंमतीला ही लस राज्यांना देत आहेत.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत