शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

माँ वैष्णो देवीच्या दर्शनाला वंदे भारतने; IRCTC चं खास टूर पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 4:49 PM

1 / 10
सध्या पावसाळ्याचा शेवटचा महिना असल्याने हिवाळ्यातील पिकनिकंच प्लॅनिंग होत आहे. त्यासाठी लोकेशन ठरवणे किंवा धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून पिकनिक आणि देवदर्शन दोन्हीचा प्लॅन आखणेही सुरू असते.
2 / 10
प्रवास करायचं म्हटलं की मग ट्रेनने करायचा की कारने हाही विचार असतो. ट्रेनने करायचा असेल तर आरक्षण मिळेल का, आरक्षण कुठले काढवे आणि कुठल्या ट्रेनने जावे हाही महत्त्वाचा विषय असतो.
3 / 10
आता, पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे विभागाने वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून यात्रा घडवण्याचं नियोजन केलं आहे. रेल्वेकडून नेहमीच प्रवाशांसाठी अशा पॅकेज टूर आयोजित केल्या जातात.
4 / 10
आयआरटीसीच्या नवीन पॅकेजनुसार तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेसने वैष्णव देवीचे दर्शन करता येणार आहे. मात्र, ह्यासाठी नवी दिल्लीतून तुम्हाला ट्रेनचं बुकींग करावं लागणार आहे.
5 / 10
नवी दिल्ली रेल्वे स्थानकाहून सकाळी ६ वाजता ही ट्रेन सुटते. मंगळवार वगळून आठवड्यातील सहाही दिवस तुम्हाला ह्या ट्रेनने प्रवास करता येईल.
6 / 10
नवी दिल्लीहून दुपारी २ वाजता तुम्ही कटारा स्टेशनवर पोहोचाल. येथून तुम्हाला हॉटेलवर नेण्यात येईल. त्यानंतर, फ्रेश होताच तुम्हाला बाणगंगा येथे ड्रॉप केले जाईल. तिथून तुम्ही माँ वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकाल.
7 / 10
देवीचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा भाविकांना बाणगंगा येथून बुकींग असलेल्या हॉटेलवर नेण्यात येईल. तिथेच रात्रीचे भोजन होईल. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी नाष्ता झाल्यानंतर तुम्ही कटरा शहर फिरू शकता.
8 / 10
दुपारच्या जेवणानंतर २ वाजता तुम्हाला हॉटेल चेक आऊट करावे लागणार आहे. त्यानंतर, तुम्ही वंदे भारत ट्रेनने कटरा शहरातून रात्री ११ वाजता दिल्लीला पोहोचाल.
9 / 10
दरम्यान, एका व्यक्तीसाठी हे टूर पॅकेज ९१४५ रुपये एवढे आहे. तर, दोन जणांच्या बुकींगसाठी प्रत्येकी ७६६० रुपये द्यावे लागणार आहेत. तर, तीन व्यक्तींचं बुकींग केल्यास प्रति व्यक्ती ७२९० रुपये तिकीट असेल.
10 / 10
प्रवासात तुमच्यासमवेत ५ ते ११ वर्षांपर्यंतचे मुल असल्यास बेडसह तिकीट भाडे ६०५५ रुपये असेल, आणि बेड शिवाय मुलाचे तिकीट ५५६० रुपये प्रति मूल द्यावे लागतील.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसdelhiदिल्लीtourismपर्यटन