शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाय स्पीड, GPS आणि 'कवच' सारखे फीचर्स; जाणून घ्या, नवीन वंदे भारत ट्रेनबाबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 2:13 PM

1 / 10
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने ऑगस्ट 2023 पर्यंत 75 'वंदे भारत ट्रेन्स'चे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याअंतर्गत नवीन डिझाइन केलेल्या, अधिक आधुनिक सुविधांसह 2 वंदे भारत ट्रेन लवकरच देशातील रेल्वे रुळांवर धावताना दिसतील.
2 / 10
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक वंदे भारत ट्रेन 115 कोटी रुपये खर्चून बांधली जाईल. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई या वर्षी 15 ऑगस्टपूर्वी 16 डब्यांच्या सेमी-हाय स्पीड 2 वंदे भारत ट्रेन तयार करेल आणि या ट्रेन्स चाचणीसाठी ट्रॅकवर आणल्या जातील.
3 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात म्हटले होते की, आमच्या सरकारचे उद्दिष्ट ऑगस्ट 2023 पर्यंत वंदे भारत ट्रेनने भारतातील 75 शहरांना जोडण्याचे आहे.
4 / 10
पंतप्रधान मोदींच्या या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम जोरात सुरू आहे. या रेल्वे सुविधेत 75 वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. नवीन वंदे भारत ट्रेन जुन्या ट्रेनपेक्षा अधिक प्रगत असतील.
5 / 10
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 16 डब्यांच्या वंदे भारत ट्रेन सेटच्या निर्मितीसाठी अंदाजे 115 कोटी रुपये खर्च येईल. यापैकी दोन सेमी-हाय स्पीड ट्रेनची चाचणी यावर्षी ऑगस्टमध्ये होणार आहे. या दोन गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात आहेत.
6 / 10
वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग 160 किमी प्रतितास आहे. या ट्रेनचे नवीन डबे पूर्वीपेक्षा हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. प्रवाशांसाठी पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी जागा देण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना थेट लोको पायलटशी बोलता येणार आहे. त्याची सुविधा ट्रेनच्या प्रत्येक डब्यात असेल.
7 / 10
नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये AC-1, AC-2 आणि AC-3 स्लीपर कोच असतील. सध्या धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त बसण्याची सोय आहे. सध्या भारतीय रेल्वे दोन वंदे भारत ट्रेन चालवत आहे. एक ट्रेन दिल्ली ते कटरा दरम्यान, दुसरी ट्रेन दिल्ली ते वाराणसी दरम्यान चालवली जात आहे.
8 / 10
आयसीएफ चेन्नईचे जीएम अतुल के. अग्रवाल यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये जीपीएस आधारित प्रणाली देखील असेल, जी धावण्याची स्थिती जाणून घेण्यास सक्षम असेल. वंदे भारत ट्रेनमधील काही छोटे भाग वगळता बाकी सर्व काही मेक इन इंडिया असेल. या वंदे भारत ट्रेनमध्ये 'कवच' ही स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन सिस्टिमही असेल.
9 / 10
भारतीय रेल्वेचे एडीजी (पीआर) राजीव जैन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये स्वयंचलित मुख्य गेट असेल, ज्याचे नियंत्रण लोको पायलटद्वारे केले जाईल. ट्रेनच्या डब्यांमध्ये प्रवाशांच्या प्रवेशासाठी सेन्सर दरवाजे असतील, जे आपोआप उघडतील आणि बंद होतील. सामान ठेवण्यासाठी जागा जास्त असेल.
10 / 10
सुरक्षा उपायांमध्ये प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन खिडक्या असतील. चेन्नई आयसीएफ दर महिन्याला सुमारे 10 ट्रेन तयार करण्याची योजना आखत आहे. रायबरेली येथील एफ-कपूरथला आणि मॉडर्न कोच फॅक्टरी सुद्धा पुढील 3 वर्षांत 400 वंदे भारत ट्रेनचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याचे डबे तयार करण्याची योजना आखली आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस