शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vande Bharat Train: वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 5:47 PM

1 / 12
भारतीय रेल्वे अनेकविध बाबींमध्ये कात टाकताना दिसत आहे. एवढेच नव्हे, तर प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होताना पाहायला मिळत आहे.
2 / 12
प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान प्रवास यांचा उत्तम मिलाफ म्हणजे ट्रेन १८ (Train 18) म्हणजेच आताची वंदे भारत ट्रेन.
3 / 12
बुलेट ट्रेन, टॅल्गोचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नााही, यातच देशात हायस्पीड रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न चालू झाले. सन २०१८ मध्ये आयसीएफने ट्रेन १८ चे लोकार्पण करून देशाला एक सुखद धक्का दिल्याचे सांगितले जाते. यानंतर याचे नाव वंदे भारत (Vande Bharat Train) करण्यात आले.
4 / 12
संपूर्ण देश ७५ वा स्वातंत्र दिन साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणावेळी देशभरात ७५ वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याची घोषणा केली.
5 / 12
या ट्रेन्स भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन संपूर्ण देश जोडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. या घोषणेनंतर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये अनेक नव्या सुविधा देण्यात येणार आहेत.
6 / 12
आताच्या घडीला वंदे भारत ट्रेनची सेवा दिल्ली ते वाराणसी आणि नवी दिल्ली ते कटरा या दोन मार्गांवरच सुरू आहे. मात्र, आता देशातील ७५ मार्गांवर ही ट्रेन धावणार असल्याने या ट्रेन्समध्ये अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत.
7 / 12
वंदे भारत ट्रेनमध्ये आगामी काळात सेंट्रल कोच मॉनिटरिंग सिस्टीम असेल. सध्या या ट्रेन्समध्ये ऑनबोर्ड इन्फोटेन्मेंटची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, ट्रेनमध्ये जीपीएस आधारित सूचना प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाज्यांचा समावेश आहे.
8 / 12
वंदे भारत ट्रेनमध्ये रिक्लायनिंग सीटमध्ये पुशबॅकची सोय देण्यात येणार आहे. ट्रेनमधील प्रत्येक वातानुकूलित यंत्रणा बॅक्टेरियामुक्त केली जाईल. वंदे भारत ट्रेन्समध्ये सेंट्रल कोच मॉनिटरिंग सिस्टम असेल. आपातकालीन प्रसंगात बाहेर पडण्यासाठी चार इमर्जन्सी खिडक्या असतील. पुरापासून बचाव करण्यासाठी ट्रेनचा खालचा भाग वॉटर रेझिस्टंट असणार आहे.
9 / 12
वंदे भारत ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये चार डिझास्टर लाईट लावण्यात येतील. आपाकालीन प्रसंगात या लाइट्स सुरू होतील. वीज गेल्यास तीन तास ट्रेनमध्ये व्हेंटिलेशन सुविधा सुरू राहील.
10 / 12
प्रत्येक कोचमध्ये दोन इमर्जन्सी बटण असतील. दरवाजांच्या सर्किटमध्ये अग्निरोधक केबल्सचा वापर केला जाईल. ही संपूर्ण ट्रेन वातानुकुलित आहे. याशिवाय प्रवाशांसाठीच्या सीट, लगेज रॅक, शौचालये आधुनिक पद्धतीची आहेत.
11 / 12
प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉईंटची सोय आहे. जीपीएसवर आधारित पॅसेंजर इन्फोर्मेशन स्क्रीन आणि दिव्यांगांसाठी विशेष टॉयलेटसची सोयही या ट्रेनमध्ये आहे.
12 / 12
ही ट्रेन प्रतितास १८० किलोमीटर वेगाने प्रवास करते. सन २०२१ च्या सुरुवातीला भारतीय रेल्वेने ४४ वंदे भारत ट्रेन्समध्ये प्रोपेल्शन सिस्टीम, कंट्रोल आणि इतर उपकरणे लावण्यासाठी मेधा सर्वो ड्राईव्हसला कंत्राट दिले होते.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार